Michael Lobo Dainik Gomantak
गोवा

'कोणत्या चर्चमध्ये धर्म परिवर्तन होतं, मुख्यमंत्र्यांनी दाखवावं'

गोव्याचे विरोधीपक्षनेते मायकल लोबोंचा निशाणा, पाहणीसाठी स्वत: जाण्यास तयार असल्याचं स्पष्टीकरण

दैनिक गोमन्तक

पणजी : धर्मांतराच्या मुद्द्यावरुन विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते मायकल लोबो यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यावर निशाणा साधला आहे. कोणत्या चर्चमध्ये धर्म परिवर्तन केले जाते ते मुख्यमंत्र्यांनी दाखवून द्यावे. मी त्यांच्यासोबत पाहणीसाठी जाण्यास तयार आहे अशा शब्दात लोबोंनी मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान दिलं आहे. (Michael Lobo News Updates)

विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर मायकल लोबोंनी (Michael Lobo) सरकारविरोधात आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे. शांततामय गोव्यात काही बाहेरील व्यक्ती येऊन ही शांतता भंग करून फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत त्यापासून गोमंतकियांनी सावध राहावे. सरकारने त्याकडे कानाडोळा न करता त्याविरुद्ध योग्य पावले उचलण्याची त्यांची जबाबदारी आहे. पोलिस यंत्रणेने एखाद्या पक्षाचे ऐकून न घेता ही फूट होण्यास देऊ नये. सर्वांनी भारतीय घटनेतील नियमांचे पालन करण्याचे आवाहन मायकल लोबो यांनी केले.

यापूर्वी बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमातही लोबोंनी सरकारवर निशाणा साधला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Babasaheb Ambedkar) यांनी घटनेत जे लिहिले आहे त्याचे सर्वांनी पालन करण्याची गरज आहे. त्याचे पालन न केल्यास भारतीयांमध्ये फूट पडेल. गेल्या काही दिवसांत राज्यात लहान - सहान घटना घडून राज्यातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न झाला आहे त्याला बळी पडू नका. शांत असलेल्या गोव्यात (Goa) हिंसक प्रकार घडवून आणण्याचा प्रयत्न काही बाहेरील व्यक्तींकडून सुरू आहे. हे त्वरित रोखण्याची गरज आहे. तसे न झाल्यास राज्यातील शांतता नष्ट होईल. त्यामुळे असे हिंसक प्रकार घडू नयेत यासाठी लोकांनी एकजूट दाखवावी. अशा प्रकाराना पाठिंबा देऊ नये. राज्यातील वातावरण शांततामय राखण्याचे आवाहन विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT