Michael Lobo  Dainik Gomantak
गोवा

फूट पाडणाऱ्यांपासून गोमंतकियांनी सावध राहा: मायकल लोबो

पणजीतील काँग्रेस कार्यालयातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

दैनिक गोमन्तक

पणजी: शांततामय गोव्यात काही बाहेरील व्यक्ती येऊन ही शांतता भंग करून फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत त्यापासून गोमंतकियांनी सावध राहावे. सरकारने त्याकडे कानाडोळा न करता त्याविरुद्ध योग्य पावले उचलण्याची त्यांची जबाबदारी आहे. पोलिस यंत्रणेने एखाद्या पक्षाचे ऐकून न घेता ही फूट होण्यास देऊ नये. सर्वांनी भारतीय घटनेतील नियमांचे पालन करण्याचे आव्हान विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांनी केले.

पणजीतील (Panaji) काँग्रेस कार्यालयातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर तसेच पक्षाचे नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.

लोबो म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Babasaheb Ambedkar) यांनी घटनेत जे लिहिले आहे त्याचे सर्वांनी पालन करण्याची गरज आहे. त्याचे पालन न केल्यास भारतीयांमध्ये फूट पडेल. गेल्या काही दिवसांत राज्यात लहान - सहान घटना घडून राज्यातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न झाला आहे त्याला बळी पडू नका. शांत असलेल्या गोव्यात हिंसक प्रकार घडवून आणण्याचा प्रयत्न काही बाहेरील व्यक्तींकडून सुरू आहे. हे त्वरित रोखण्याची गरज आहे. तसे न झाल्यास राज्यातील शांतता नष्ट होईल. त्यामुळे असे हिंसक प्रकार घडू नयेत यासाठी लोकांनी एकजूट दाखवावी. अशा प्रकाराना पाठिंबा देऊ नये. राज्यातील वातावरण शांततामय राखण्याचे आवाहन विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांनी केले.

घटनेचे रक्षण करून त्याचे पालन करा, असे लोबो यांनी सांगितले. काही लोक स्वहितासाठी राज्यातील वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न करत आहे त्यांना येथील राजकीय पक्षांनी सहकार्य करू नये. फूट पाडण्याचे प्रयत्न हे घटनेच्या विरोधात असल्याने पोलिस यंत्रणेने नियमात राहून त्याविरुद्ध कारवाई करायला हवी. बाहेरून येणाऱ्या शक्ती लोकांना आमिषे दाखवून आपल्याकडे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र त्यांना गोव्यातील (Goa) लोक बळी पडले नाहीत. त्यांचे असलेले उद्दीष्ट साध्य झाले नाही व होऊ दिले जाणारही नाही, असे लोबो म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

El Nino Rabi Crops: 'एल निनो'चा रब्बीला मोठा फटका? केंद्रीय कृषी सचिवांचा इशारा; कोरडवाहू भागांसमोर संकट

ODI World Cup 2027 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! 2027 वनडे वर्ल्ड कपचं शेड्यूल 1 ऑक्टोबरला होणार जाहीर

Goa SIR: 'अल्पसंख्याकांना लक्ष्य केलेले नाही'; SIR वादावर मुख्यमंत्री सावंतांचा दावा, विरोधकांचे आरोप तथ्यहीन

SCROLL FOR NEXT