Michael Lobo  Dainik Gomantak
गोवा

‘डीएसएसवाय’ योजनेअंतर्गत नागरिकांना आर्थिक सहाय्य द्या: मायकल लोबो

समाजकल्याण खात्याचे अधिकारी धारेवर

दैनिक गोमन्तक

पणजी: दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेखालील (डीएसएसवाय) लाभार्थ्यांच्या घरातील अनुपस्थितीमुळे त्यांना दरमाह मिळणारे आर्थिक सहाय्य बंद करण्यात आले तर गेल्या तीन महिन्यांपासून लाभार्थ्यांना ते देण्यात आलेले नाही. विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांनी समाजकल्याण खात्याला भेट देऊन अधिकाऱ्यांना धारेवर धरले. या लाभार्थ्यांचे प्रलंबित असलेले आर्थिक सहाय्य लेखा खात्यामध्ये जाऊन ते त्वरित वितरित करण्याच्या सूचना केल्या. डीएसएसवाय या योजनेखाली ज्येष्ठ नागरिक, विधवा व विकलांग यांना प्रतिमाह आर्थिक सहाय्य सरकारकडून दिले जाते; मात्र जानेवारी ते एप्रिलपर्यंत त्याचे वितरण अजूनही करण्यात आलेले नाही.

या योजनेखाली करण्यात आलेल्या सर्वेमध्ये लाभार्थी घरी सापडला नाही तर त्याचे नाव यादीतून गाळण्यात आले आहे. अशा अनेक तक्रारी विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांच्याकडे आल्याने त्यांनी या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी आज समाजकल्याण खात्याच्या अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली. या चुकीच्या सर्वेप्रकरणी लाभार्थ्यांना फटका बसला असल्याने त्याला जबाबदार कोण असा जाब विचारला. किती जणांची नावे गाळण्यात आली व पुनर्चौकशीनंतर किती जणांची नावे पुन्हा यादीमध्ये समावेश करण्यात आली याची माहिती द्या असे त्यांनी सांगितले. या सर्वेवेळी सुमारे ३ हजार नावे गाळण्यात आली तर या प्रकरणी लाभार्थ्यांनी चौकशी केल्यानंतर 50 टक्के पुन्हा समाविष्ठ करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

खात्यातर्फे करण्यात येणाऱ्या चुकीच्या सर्वेमुळे लाभार्थ्यांना मात्र नाहक त्रास होत आहे. या योजनेचे बहुतेक लाभार्थी हे गरीब असून या रक्कमेतून काहीजण स्वतःचा औषधाचा खर्च तर काहीजण उदारनिर्वाह चालवित असतात. अचानक बंद झालेल्या आर्थिक सहाय्यामुळे त्यांना हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. या लाभार्थ्यांची पंचायतीच्या सरपंच, सचिव किंवा तलाठी यापैकी एकाकडून शहानिशा किंवा या तिघांपैकी एकाने दिलेले पत्र खात्याने ग्राह्य धरावे, अशी सूचना लोबो यांनी अधिकाऱ्यांना केली. नव्या पद्धतीनुसार खात्याचा एक कर्मचारी पंचायतीमध्ये जाऊन शहानिशा करत आहेत. यापुढे असे प्रकार सर्वेत घडण्याची शक्यता कमी आहे असे अधिकाऱ्यांनी माहिती दिली.

या प्रकरणी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून लेखा खात्याला या लाभार्थींची आर्थिक सहाय्य रक्कम त्वरित वितरित करण्याची विनंती करणार असल्याचे लोबो यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT