Michael Lobo Dainik Gomantak
गोवा

मला मुख्यमंत्री व्हायचं नाही मात्र... लोबोंच्या वक्तव्याचा नेमका अर्थ काय?

विरोधकांना एकत्र करत पुढील 10-15 महिन्यात गोव्यात सरकार स्थापन करण्याचा दावा

दैनिक गोमन्तक

पणजी : गोव्याच्या राजकारणात काहीही होऊ शकतं. त्यामुळे फक्त 10-15 महिन्यात भाजपचं सरकार पडणार असून काँग्रेस सरकार स्थापन करेल असं वक्तव्य मायकल लोबो यांनी केलं होतं. आता मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मैदानात येत लोबोंच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला आहे. मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही. मात्र भाजपला सत्तेपासून दूर करण्यासाठी आम्ही जो येईल त्याला मुख्यमंत्री करायला तयार आहोत, असं खुलं निमंत्रण लोबोंनी सर्व विरोधकांना एकत्र करण्यासाठी दिलं आहे.

मायकल लोबो (Michael Lobo) यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना भाजपवर निशाणा साधला आहे. भाजपच्या विरोधात गोव्यात गोवा फॉरवर्ड, रिव्हॉल्युशनरी गोवन्स, आपसारखे अनेक पक्ष आहेत. सत्ता स्थापन करायचीच असेल तर तीन अपक्षांनाही सोबत घेऊ. मगोपलाही सोबत घेत आम्ही सरकार स्थापनेसाठी प्रयत्न करणार असल्याचं लोबोंनी म्हटलं आहे. गोव्याचं राजकारण फार वेगळं आहे हे सर्वांनी याआधी पाहिलेलंच आहे, त्यामुळे येत्या काही महिन्यात गोव्यातील राजकारण बदलेल असा दावाही लोबोंनी केला आहे.

गोव्यात मायकल लोबोंची विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर लोबो आणखी प्रभावीपणे भाजपच्या (BJP) विरोधात मैदानात उतरले आहेत. दुसरीकडे मुख्यमंत्री प्रमोद सावंतांनीही लोबोंच्या वक्तव्याला जशास तसं उत्तर दिलं आहे. भाजपने गोव्यात सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापन केलं आहे. त्यामुळे पक्षाची जबाबदारीही वाढली आहे. मतविभाजनाचा काँग्रेसला फटका बसला हा काँग्रेसचा (Congress) खोटा दावा असून भाजपचं सरकार 2027 पर्यंत पाच वर्षांचा कार्यकाळ कोणत्याही अडचणीशिवाय पूर्ण करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. गोव्याच्या विकासासाठी भाजपचं डबल इंजिन सरकार कायम कार्यरत राहिल असा दावाही त्यांनी केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Team India: "मी आत्महत्या करणार होतो", टीम इंडियाच्या स्टार खेळाडूचा धक्कादायक खुलासा; क्रिडाविश्वात खळबळ

Goa Accidental Deaths: ..अजून किती लोकांचे जीव जाणार? गोव्यात अपघाती बळींचे दीडशतक; 25 जुलैपासून सात जणांचे मृत्यू

Liquor Deaths Goa: गोव्यात दारूमुळे होतो 'इतक्या' लोकांचा मृत्यू, धक्कादायक आकडेवारी उघड; सर्वाधिक मृत्‍यू 41 ते 50 वयोगटातील

Amthane Dam: प्रतिक्षा कधी संपणार? 'आमठाणे धरण' अजूनही कोरडेच! गेट दुरुस्तीचे काम लांबणीवर

Ladli Laxmi Yojana: गावडेंकडून महिला-बाल कल्‍याण अधिकारी लक्ष्य, 'लाडली लक्ष्‍मी'च्‍या प्रलंबित अर्जांवरून अधिकाऱ्यांवर केले आरोप

SCROLL FOR NEXT