Michael Lobo Dainik Gomantak
गोवा

भाजपने भंडारी नेत्यांना अडगळीत टाकले : मायकल लोबो

सामान्य माणसाच्या समस्यांना भाजपकडून काडीचीही किंमत नाही, लोबोंचा आरोप

दैनिक गोमन्तक

कळंगुट : भाजप सरकारमध्ये मुख्यमंत्री प्रमोद सावंतांना पक्षातीलच एक संघटक कळसुत्री बाहुलीप्रमाणे नाचवत होता, भंडारी समाजाच्या नेत्यांनाही अडगळीत टाकले गेले, अशी टीका मायकल लोबो यांनी केली.

ते पुढे म्हणाले, सामान्य माणसाच्या समस्यांना तसेच भावनांना काडीचीही किंमत राहिली नाही. भंडारी समाजाचे कार्ड वापरीत सत्तास्थानी पोहोचलेल्या भाजपने भंडारी समाजाच्या नेत्यांना हेतुपुरस्सर मुख्यमंत्री पदापासून दूर ठेवत अडगळीत टाकले होते, त्यामुळेच पक्षाचा त्याग करण्याचा मला निर्णय घ्यावा लागला. गोमन्तक टी. व्ही. ला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत लोबो बोलत होते. (Michael Lobo News Updates)

राज्यात स्थिर आणि कार्यक्षम नेतृत्व देण्याच्या उद्देशाने आपण काँग्रेस (Congress) पक्षात प्रवेश केला आणि राज्यात पुढील सरकार काँग्रेसचेच स्थापन होणार असल्याचा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला. काँग्रेसने फुटीरांना हेतुपुरस्सर निवडणुकीच्या रिंगणातून बाजूला सारले. तसेच नव्या दमाच्या नवीन उमेदवारांना जनतेसमोर आणले लोकांनी नव्या रक्ताला यंदा संधी देण्याची आग्रही मागणी लोबो यांनी एका प्रश्नावर उत्तर देताना केली. काँग्रेस सत्तेत आल्यास प्रत्येक निर्णयासाठी हायकमांडवर अवलंबून न राहता राज्याच्या हिताचे महत्त्वाचे निर्णय राज्यसरकारकडूनच घेतले जातील, असे त्यांनी सांगितले.

डिलायला लोबो यांना भाजपने (BJP) शिवोलीची उमेदवारी दिली असती, तर तुम्ही पक्षातच राहिला असता काय? या प्रश्नांवर आपण कधीच आणि कोणाशी डिलायलांच्या उमेदवारी संबंधात बोललो नव्हतो, असे समुद्राच्या साक्षीने हात जोडत लोबो यांनी उत्तर दिले. येत्या विधानसभा निवडणुकीत (Goa Assembly Elections) भाजपला दोन अंकी आकडा पार करू देणार नसल्याची भीमगर्जना करणाऱ्या माजी मंत्री मायकल लोबो यांनी संपूर्ण पक्षाची जबाबदारी आपल्या शिरावर घेत गोव्याच्या कानाकोपऱ्यात जोरदार प्रचार चालवलेला असून राज्यात काँग्रेसचे सरकार सत्तेत आल्यास पक्षाचे वरिष्ठ जी जबाबदारी आपल्या शिरावर देतील, ते जबाबदारी आत्मीयता आणि जबाबदारीने पार पाडणार असल्याचे मायकल लोबो यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT