Miccky Pacheco files complaint against Subhash Velingkar Dainik Gomantak
गोवा

सेंट फ्रान्सिस झेविअरबाबत आक्षेपार्ह विधान, सुभाष वेलिंगकरांविरोधात तक्रार

सुभाष वेलिंगकर गोव्यात धार्मिक तेढ निर्माण करत असल्याचा मिकी पाशेकोंचा आरोप

दैनिक गोमन्तक

पणजी : सेंट फ्रान्सिस झेविअरबाबत आक्षेपार्ह विधान करून सुभाष वेलिंगकर गोव्यात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न करत आहेत. त्यामुळे वेलिंगकर यांच्याविरोधात गुन्हा नोंदवून कारवाई करावी, अशी मागणी माजी मंत्री मिकी पाशेको यांनी केली आहे. मिकी यांनी याप्रकरणी कोलवा पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

सुभाष वेलिंगकर यांनी परशुरामच गोव्याचे रक्षणकर्ते आहेत. त्यामुळे फ्रान्सिस झेवियरला ‘गोंयचो सायब’ म्हणणे चुकीचे असल्याचं वक्तव्य केलं होतं. गोव्यामध्ये होली इंक्विजिशन ही क्रूर यंत्रणा आणण्यास फ्रान्सिस झेवियर हाच पूर्णपणे जबाबदार होता, असं म्हणत गोव्यात होली इंक्विजिशनने अडीचशेहून अधिक वर्षे केलेल्या जुलमी अत्याचारांची माहिती आताच्या गोव्यातील नव्या पिढीला देणं गरजेचं आहे. यासाठीच मंगळवारी,3 मे रोजी ‘गोवा फाईल्स’ गोमंतकीयांसमोर ठेवणार असल्याचं वक्तव्य हिंदू रक्षा महाआघाडी गोवाचे राज्य निमंत्रक प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी केलं होतं. आता वेलिंगकरांच्या वक्तव्याचे तीव्र पडसाद राज्यात उमटू लागले आहेत.

दुसरीकडे टीएमसी नेते चर्चिल आलेमाव यांनीही सुभाष वेलिंगकर यांच्याविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. वेलिंगकरांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवत गोव्यातील जातीय आणि धार्मिक सलोखा वेलिंगकर धोक्यात आणत असल्याचा निशाणा आलेमाव यांनी साधला आहे. वेलिंगकरांनी दुसऱ्या धर्मांचा आदर करावा अन्यथा गोवा सोडून जावं, अशी तीव्र प्रतिक्रिया चर्चिल आलेमाव यांनी दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Record: 22 षटकार, 17 चौकार… टी20 क्रिकेटमध्ये ठोकलं 'द्विशतक', 140 किलो वजनाच्या खेळाडूनं घातला धुमाकूळ; गोलंदाजांच्या उडवल्या चिंधड्या

Strait of Hormuz: इराणचा अमेरिकेला 'डिजिटल' दणका! होर्मुजच्या सामुद्रधुनीतील इंटरनेट केबल्सवर नियंत्रण मिळवण्याची तयारी; जागतिक दळणवळण धोक्यात

Shani Gochar 2026: शनीदेवाचा रेवती नक्षत्रात धमाका! 2 जुलैपासून 'या' 3 राशींना लागणार लॉटरी; उत्पन्नात होणार मोठी वाढ

पेडण्यात सिंधुदुर्गची ताजी मासळी, रखडलेल्या प्रकल्पामुळे सुविधांचा अभाव; ग्राहकांचा नाईलाज

Goa Assembly Election 2027: गोव्यात आगामी सरकार काँग्रेसचेच! अमित पाटकरांनी व्यक्त केला विश्वास; केरळ, तमिळनाडू विजयाबद्दल काँग्रेसकडून जल्लोष

SCROLL FOR NEXT