Construction Waste  Dainik Gomantak
गोवा

Mhapsa: रस्‍त्‍यावर बांधकाम कचरा टाकणाऱ्यास 25 हजारांचा दंड

Mhapsa: म्हापसा पालिकेने ही कडक कारवाई करत बांधकाम कंत्राटदारांना अद्दल घडवली आहे.

दैनिक गोमन्तक

Mhapsa: कामरखाजन-म्हापसा येथे सर्व्हिस रस्त्यावर बांधकाम साहित्याचा राडारोडा (डेब्रिज) टाकल्याबद्दल म्हापसा पालिकेने कंत्राटदार रमेश पवार याला 25 हजारांचा दंड ठोठावला. शिवाय या रस्त्यावर टाकलेला हा कचरा उचलून नेण्यास त्यास भाग पाडले.

प्राप्त माहितीनुसार, ही घटना बुधवारी सायंकाळी चारच्या सुमारास घडली. पेडे-गिरी या सर्व्हिस रस्त्यावर कामरखाजन येथे बांधकाम साहित्य कचरा एका ट्रकमधून खाली केला जात असल्याचे म्हापसा स्थानिक रहिवाशांच्या निदर्शनास आले.

सदर प्रकारास त्‍यांनी हरकत घेत हा ट्रक (जीए 03 एन 4037) पकडून पालिका तसेच म्हापसा पोलिसांना पाचारण केले. नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागृती वाढलेली यातून दिसते. सार्वजनिक स्वच्छता राखली जावी म्हणून प्रशासनाकडून ही कारवाई लगेच करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ajinkya Rahane Retirement: अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती, भावनिक VIDEO शेअर करत म्हणाला, "मी माझ्या फलंदाजीमध्ये..."

Mapusa Traffic Police: म्हापशाच्या रस्त्यांवरील ट्रॅफिक जॅमला बसणार ब्रेक! 'वाहतूक व्यवस्थेवर लक्ष ठेवा!' उपसभापतींच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक

Goa Cyber Fraud Cases: गोव्यात सायबर फसवणुकीचे वाढते जाळे; ऑनलाईन व्यवहारांत नागरिकांना लाखो रुपयांचा गंडा, पोलिसांचा सतर्कतेचा इशारा

Bharatiya Nyaya Sanhita Cases: सुमारे 78% प्रकरणांत आरोपपत्रे दाखल; 'बीएनएस' अंतर्गत गेल्‍या दोन वर्षांत 4,459 गुन्‍ह्यांची नोंद

Goa Cooperative Societies: राज्यातील 42% सहकारी सोसायट्या बंद, 42% सोसायट्या तोट्यात; सहकार क्षेत्राच्या आर्थिक सक्षमतेवर केंद्रीय सहकारमंत्र्यांकडून प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT