Goa public transport update Dainik Gomantak
गोवा

Mhaji Bus Goa: सरकारच्या ‘म्हाजी बस’ला लागला ‘ब्रेक’! खाजगी बस मालकांच्या दबावामुळे 16 मे पासून योजना बंद

Mhaji Bus scheme stopped: राज्य सरकारची ‘म्हाजी बस’ योजना अखेर थांबवण्यात थांबवण्याचा निर्णय घेण्यात आलाय

Akshata Chhatre

पणजी: ग्रामीण भागातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला चालना देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेली राज्य सरकारची ‘म्हाजी बस’ योजना अखेर थांबवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. खाजगी बस वाहतूकदारांच्या दबावामुळे राज्य सरकारने ही योजना येत्या १६ मे पासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे दुर्गम भागांतील लोकांसमोर पुन्हा एकदा वाहतुकीचा प्रश्न उभा राहण्याची शक्यता आहे.

विशेष म्हणजे एकीकडे ही योजना बंद करत असताना, दुसरीकडे प्रति किलोमीटर ३ रुपये इंधन अनुदान, वार्षिक वाहन विमा खर्चात ५० टक्के सवलत आणि नवीन बस खरेदीसाठी तब्बल १० लाख रुपयांचे अनुदान देण्याचा सरकारचा विचार आहे.

ऑगस्ट २०२३ मध्ये प्रायोगिक तत्त्वावर ‘म्हाजी बस’ योजना सुरू करण्यात आली होती. कदंब परिवहन महामंडळ लिमिटेडने ऑगस्ट २०२३ ते एप्रिल २०२५ या काळात या योजनेतून सुमारे ११.१० कोटी रुपयांचा महसूल मिळवला होता.

मात्र, ही योजना चालवण्यासाठी सरकारला ११.६६ कोटी रुपयांचे अतिरिक्त अनुदान द्यावे लागले होते. विशेष म्हणजे २०२५-२६ च्या नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात या योजनेच्या विस्तारासाठी ८ कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली होती.

या योजनेअंतर्गत एकूण ५७ बसेस काणकोण, केपे आणि दक्षिण गोव्यातील इतर दुर्गम भागांतील मार्गांवर धावत होत्या. ज्या ठिकाणी विशेषतः संध्याकाळच्या वेळी, सार्वजनिक वाहतुकीची मोठी गैरसोय होते, अशा भागांना या योजनेने लक्ष्य केले होते.

खाजगी बस चालकांनी ‘म्हाजी बस’ योजनेला सुरुवातीपासूनच तीव्र विरोध दर्शवला होता. २०१८ सालापासूनचे सुमारे ३६ कोटी रुपयांचे इंधन अनुदान अद्याप प्रलंबित असल्याचा त्यांचा दावा होता. या सततच्या विरोधामुळे आणि दबावामुळे अखेर सरकारने ही योजना बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT