Mahadayi Water Dispute Dainik Gomantak
गोवा

Mhadei Water Dispute: 'म्हादई' प्रकरणी बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; CM सावंत म्हणतात गोवा जिंकणार

म्हादई प्रकरणी 29 नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

Pramod Yadav

Mhadei Water Dispute: 'म्हादई' प्रकरणी कर्नाटकविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली केस गोवा निश्चित जिंकेल, असा विश्वास मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सोमवारी व्यक्त केला.

"आम्ही या खटल्याबाबत खूप गंभीर आहोत आणि पुराव्याच्या बाबतीत देखील आम्ही खूप मजबूत आहोत, गोवा हा खटला जिंकेल, असा आम्हाला विश्वास आहे,” असे मुख्यमंत्री सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

म्हादई प्रकरणी 29 नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. कायदेशीर टीम या प्रकरणाचा आढावा घेत आहे आणि या प्रकरणाकडे आमचे बारीक लक्ष आहे, असे सावंत म्हणाले.

गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी शनिवारी या विषयावर सभागृह समितीची बैठक बोलावण्याची मागणी केली, याप्रकरणी फेब्रुवारीमध्ये शेवटची बैठक झाली होती.

"सभागृह समितीची बैठक लवकर बोलवा. मोठ्या विलंबानंतर अखेर सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण बुधवारी (29 नोव्हेंबर) सुनावणीसाठी ठेवले आहे. या महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी सोमवारी म्हादईवर सभागृह समितीची बैठक घेण्याची मागणी करतो, असे सरदेसाई म्हणाले.

मी जलसंपदा मंत्री सुभाष शिरोडकर यांना पुढाकार घेण्याची विनंती करतो, असे सरदेसाई म्हणाले.

म्हादईचे पाणी वळविण्याबाबतची लढाई प्रशासकीय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या पातळीवर लढली जाईल, असे सभागृह समिती प्राथमिक बैठकीच्या अध्यक्षस्थानी असलेल्या सुभाष शिरोडकर यांनी सांगितले होते.

वादग्रस्त कळसा-भांडुरा प्रकल्पासाठी कर्नाटकने तयार केलेल्या सविस्तर प्रकल्प अहवालाला केंद्रीय जल आयोगाने मंजुरी दिल्यानंतर गोव्यातील भाजप सरकारवर राज्यातून टीका झाली होती. यानंतर गोवा सरकारला या प्रकरणी सभागृह समिती नेमणे भाग पडले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT