Goa Karnataka Mhadei Water Disputr Dainik Gomantak
गोवा

Kalasa Banduri: 'कळसा'च्या संयुक्त पाहणीस कर्नाटकची नकारघंटा! गोव्यासमोर ठेवली विचित्र अट; आक्षेप कायम

Mhadei River Dispute: चर्चेनंतर निर्णय घेण्यात आला की, प्राधिकरण कायदा विभागाच्या पत्रानुसार आवश्यक ती कारवाई करेल आणि राज्येही स्वतःच्या निर्णयानुसार योग्य ती कारवाई करू शकतील.

Sameer Panditrao

पणजी: म्हादई नदीचे पाणी मलप्रभा नदीच्या पात्रात वळवण्यासाठीच्या कळसा प्रकल्पाची संयुक्त पाहणी करण्यास कर्नाटकने आपला आक्षेप कायम ठेवला आहे. बंगळूर येथे झालेल्या प्रवाह अधिकारीणीच्या बैठकीत कर्नाटकने संयुक्त पाहणीस परवानगी देण्याच्या बदल्यात सर्वोच्च न्यायालयातील खटला मागे घेण्याची अट गोव्यासमोर ठेवली.

राज्याचे जलसंपदा मुख्य अभियंता प्रमोद बदामी बैठकीच्या ठिकाणी होते. त्यानी सांगितले, की कर्नाटकमधील कळसा नाला प्रकल्पाच्या संयुक्त पाहणीसंदर्भात गोवा सरकारच्या पत्रावर चर्चा हा विषय विषयसुचीवर दुसऱ्या क्रमांकावर होता. प्रवाहच्या तिसऱ्या बैठकीत गोवा राज्याने कळसा नाल्याच्या संयुक्त पाहणीची विनंती केली होती. त्यावर प्राधिकरणाने जलसंपदा, ग्रामीण विकास व गंगा पुनरुज्जीवन मंत्रालयामार्फत कायदेशीर सल्ला घेण्याचा निर्णय घेतला होता, कारण ही बाब सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या अवमान याचिकाअंतर्गत प्रलंबित आहे.

कर्नाटक राज्याने मात्र या मुद्यावर कोणतीही चर्चा होऊ नये, असे स्पष्ट केले. कारण ही बाब न्यायालयात आहे. चर्चेनंतर निर्णय घेण्यात आला की, प्राधिकरण कायदा विभागाच्या पत्रानुसार आवश्यक ती कारवाई करेल आणि राज्येही स्वतःच्या निर्णयानुसार योग्य ती कारवाई करू शकतील असे ठरवण्यात आले, असे बदामी यांनी सांगितले.

या बैठकीस गोव्याचे जलसंपदा सचिव एस. एस. गिल प्रवाहचे सदस्य या नात्याने उपस्थित होते. त्यांना मदत करण्यासाठी बदामी आणि जलसंपदा पर्यवेक्षक अभियंता (म्हादई विभाग) दिलीप नाईक उपस्थित होते. कर्नाटकचे अतिरिक्त सचिव गौरव गुप्ता, तर महाराष्ट्राचे कार्यकारी अभियंता विनायक जाधव यांनी महाराष्ट्राची बाजू बैठकीत मांडली.

शासकीय वकीलांचा सल्ला घेणार

केंद्रीय मंत्रालयाने ८ नोव्हेंबर २०२४ रोजी उत्तर दिले की, ही बाब न्यायप्रविष्ट असल्यामुळे कायदा विभागाने कोणतीही टिप्पणी देण्यास नकार दिला आहे. मात्र, त्यांनी सर्वोच्च न्यायालयातील शासकीय वकीलाचा सल्ला घेऊन पुढील दिशानिर्देश घेण्याचा सल्ला दिला आहे. आजच्या बैठकीत गोवा राज्याने त्या सल्ल्यानुसार सर्वोच्च न्यायालयात शासकीय वकीलांचा सल्ला घेण्यावर भर दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 6 स्टार खेळाडूंना डच्चू, कोहली- बुमराहचं कमबॅक

Monsoon Update: पावसाची चाहूल; 22 आणि 23 जूनला अनेक भागांत पावसाचा अंदाज, यलो अलर्ट जारी

Land Fraud Case: अंबेशी येथील जमीन व्यवहारात कोट्यवधी रुपयांची फसवणूक, जमीनमालकाची वाळपई पोलिसांत तक्रार दाखल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! महागाई भत्त्यात 3% वाढीची शक्यता; पगारवाढ कधीपासून लागू होणार?

Karapur Mega Project: कारापूर प्रकल्प विरोधातील आंदोलन तापण्याची शक्यता, पायवाटांवरून पुढे केलेल्या अटी ग्रामस्थांना अमान्य

SCROLL FOR NEXT