Goa Sonal Road Dainik Gomantak
गोवा

Valpoi: सोनाळ-तार रस्ता प्रश्नाकडे दुर्लक्ष; नागरिक प्रचंड नाराज

Sonal Road: सोनाळ ते तार कडतरी दरम्यानच्या रस्त्याची उंची वाढवण्याची आवश्‍यकता आहे

गोमन्तक डिजिटल टीम

वाळपई: म्हादई नदीला पूर आल्यानंतर सावर्डे ग्रामपंचायत क्षेत्रातील सोनाळ, तार, कडतरी या गावांचा संपर्क नेहमी तुटतो. पुरावेळी येथील रस्ता पाण्याखाली जातो. त्यामुळे लोक अडकून पडतात. त्यामुळे सोनाळ ते तार कडतरी दरम्यानच्या रस्त्याची उंची वाढवण्याची आवश्‍यकता आहे, परंतु स्थानिक लोकप्रतिनिधी व सरकारने याकडे अक्षम्य दुर्लक्ष चालवले आहे. त्यामुळे येथील नागरिक प्रचंड नाराजी व्यक्त करीत आहेत.

तार, सोनाळ हा रस्ता सखल भागात आहे, त्यामुळे येथे पाणी मोठ्या प्रमाणात तुंबते. रस्ता पाण्याखाली जातो, तसेच रस्त्यालगत असलेल्या घराला देखील पाणी शिरते. या पावसाळ्यात आतापर्यंत तीनवेळा सोनाळ, कडतरी गावाचा संपर्क तुटला.

केवळ आडवाटेचा पर्याय...!

रस्ता पाण्याखाली गेल्यानंतर बाहेरगावी गेलेल्या लोकांना आपली वाहने तार गावच्या वेशीवर ठेवून आडवाटेने आपले घर गाठावे लागते. हा प्रकार आता नित्याचा झाला आहे.

बागायतींचे नुकसान

नदीला येणाऱ्या पुरामुळे सोनाळ, कडतरी या भागातील बागायती पिकांचे दरवर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान होते. यंदाही बागायतींचे मोठे नुकसान झाले आहे. घुसल्याने बागायती पिकांनाही मोठा फटका बसत असतो.

सरकार मोठ्या दुर्घटनेची वाट पाहत आहे का?

सोनाळ येथील गणेश पर्येकर यांनी सांगितले की, तार येथे रस्त्यावर पाणी येणे हे आता नेहमीचेच बनले आहे. त्यामुळे येथील लोकांची नेहमी कुचंबणा होते. जंंगलातील आडवाटेने जावे लागते. तारपासून ते सोनाळ येथील मारुती मंदिरापर्यंतच्या रस्त्याची उंची वाढवण्याची गरज आहे. लोकप्रतिनिधी तसेच सरकारी यंत्रणांच्या नजरेस अनेकदा ही गोष्ट आणूनही याकडे दुर्लक्ष केले जात आहे. सरकार मोठ्या दुर्घटनेची वाट पाहत आहे का, असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: 'कॅश फॉर जॉब प्रकरण'; काँग्रेस युथ पदाधिकाऱ्यांची म्हार्दोळ पोलिस स्थानकावर धडक!

Nagarjuna At IFFI 2024: नागार्जुन यांचा इफ्फीत जलवा! दाखवली नृत्याची झलक; स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाबाबत म्हणाले की..

IFFI 2024: गोमंतकीय फिल्ममेकर्ससाठी खुशखबर! कलाकार, निर्मात्‍यांसाठी विशेष मास्टर्स क्लास; दिलायला यांची माहिती

IFFI 2024: सिनेविश्वातील महिलांच्या सुरक्षेबाबत भूमी पेडणेकरचे मार्मिक विधान, 'पॉवर प्ले आहे पण..'

Pooja Naik Case: कोट्यवधीची फसवणूक करणाऱ्या 'कॅश फॉर जॉब' प्रकरणातील मास्टरमाईंड पूजा नाईकला जामीन मंजूर

SCROLL FOR NEXT