कणकीरे येथे कोसळलेले गरीब आदिवासी कुटुंबाचे घर Dainik Gomantak
गोवा

Goa: म्हादई पुरात 'गरीब कुटुंबे' झाली बेघर

पर्ये सत्तरीत 23 जुलैला म्हादई नदीला( River Mhadei - Mandovi in Satari) महापूर येऊन त्याचा फटका नदी किनारी भागाला लागला.

दैनिक गोमन्तक

पर्ये सत्तरीत 23 जुलैला म्हादई नदीला( River Mhadei - Mandovi in Satari) महापूर येऊन त्याचा फटका नदी किनारी भागाला लागला. त्यातून घरातील वस्तू - उपकरणे वाहून जाणे, खराब होणे असे प्रकार घडले. शेती बागायतीची प्रचंड नुकसान झाली. पण त्यापेक्षाही बेघर झाली ती त्या त्या भागातील हातावर संसार असलेली 'गरीब कुटुंबे'. त्यामुळे हा पूर त्यांच्यासाठी त्यांचे छत हिरावणारा, त्यांना आर्थिक संकटात नेणारा ठरला. (Mhadei floods make poor families homeless)

म्हाडई नदी किनारी असलेल्या सोनाळ ते उसगाव खांडेपार ( sonal to khandepar) पर्यत या पुराचा सर्वाधिक फटका बसला. त्यात किनारी भागातील अनेक घरे जमीनदोस्त झाली. पुरात जमीनदोस्त झालेली बहुतेक सर्व घरे ही मातीची जुनाट घरे होती. जी कुटुंबे त्या त्या गावांमध्ये अत्यंत गरिबीत जीवन जगायची त्यांचीच घरे मातीची शिल्लक राहिली होती. आणि अशीच मातीची घरे या पुराच्या पाण्याच्या जोराने कोसळली गेली.

या पुरात कुडशे (kudashe) येथे एक, वाळपई ( valpoi) शहरातील 2, शिवाजीनगर खडकी( shivajinagar khadaki) येथे 5, कणकीरे ( kankire)येथे 2, गांजे ( ganje) येथे 4, अडवई (advoi) येथे 1, बोणकेवाडा वांते (bonkewada vante) येथे 1, उसगाव तिराळ( tiral usgao) येथे 2 अशी घरे पूर्णपणे जमीनदोस्त झाली. तसेच इतर घरांना ही कमी-मोठ्या प्रमाणात नुकसानी झाल्या. पण येथे पूर्णपणे कोसळलेल्या बहुतेक कुटुंबाची आर्थिक परिस्थिती खूपच हलाखीची होती.

त्यांच्या घरांमध्ये सरकारी नोकरदार सोडाच खाजगी कंपनी मध्ये कायमस्वरूपी नोकरीला सुद्धा कोण नव्हते. या प्रतिनिधीने केलेल्या एक पाहणीत यांचे कर्ते पुरुष अथवा कमावणारी व्यक्ती एखाद्या खाजगी आस्थापनात कंत्राटी कामगार किंवा रोजंदारीवर काम करणारे होते. त्यामुळे ही कुटुंबे गरीबच होती. आणि गरीब असल्या कारणाने यांची घरे मातीची राहिली. व ही मातीची घरे या पुरात कोसळली गेली.

तसेच असेही निरीक्षणात आले की यातील बहुतेक कुटुंबे ही दलित व आदिवासी समाजातील आहे. सत्तरीतील या दोन्ही समाजाच्या बहुतेक जणांकडे जमिनीची अथवा शेती बागायतीची मालकी नाही. या पुरात बेघर झालेली या दोन्ही समाजाच्या बेघर कुटुंबाकडे अशी शेती बागायती उत्पन्न काहीच नाही. त्यांची उभी असलेली घरे सुध्दा तिथल्या जमीनदारांच्या जमिनीत आहे अशाने त्यांना रोजगारा व्यतिरिक्त शेती बागायतीचे उत्पन्न नाही. अशाने ही कुटुंबे गरीब राहिली व त्याचा फटका त्यांना या पुरात भोगावा लागला.

दरम्यान सरकारने जी दोन लाखांची आर्थिक मदत देण्याचे जाहीर केले आहे ती रक्कम म्हणजे खूपच कमी आहे असे मत वाळपईतील सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र गावकर (devendra gaonkar) यांनी केले आहे. ते पुढे म्हणतात, जी घरे कोसळली त्या ठिकाणी मातीची घरे उभारणे म्हणजे धोक्याचे आहे. कारण या भागात भविष्यात पुन्हा पूर येण्याची शक्यता आहेच. त्यामुळे त्यांनी जांब्या दगड -सिमेंटची घरे उभारावी.

सद्य वाळू- सिमेंट- चिरे किंवा मजुरांच्या किमती गगनाला भिडलेल्या आहे. अशातून दोन लाखांमध्ये घर उभारणे कितपत शक्य होईल. त्याचबरोबर त्यांचे घरातील सामान ही वाहून गेले आहे. या सर्वांची किंमत पाहता दोन लाख खूपच कमी आहे. काम करून पोट भरणे असाच जर त्यांचे जीवन होते तर त्यांच्याकडे ठेवीचे पैसे कुठे असणार नाही किंवा कोण कर्जही देणार नाही. त्यामुळे सरकारने त्यांना चांगल्या पैकी आर्थिक मदत करून त्यांचा संसार उभावावा अशी मागणी त्यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

King Momo 2026: कार्निव्हल 2026 चे बिगुल वाजले! सेड्रिक डी कोस्टा यांची 'किंग मोमो' म्हणून घोषणा

IND vs NZ: विजेच्या वेगाने आला चेंडू अन्... श्रेयस अय्यरच्या 'रॉकेट थ्रो'ने उडवले स्टंप्स; ब्रेसवेलची डायव्हही ठरली अपयशी Watch Video

Viral Video: 'धूम' स्टाईल स्टंट अन् थेट जमिनीवर लोळण! दिल्ली पोलिसांचा रीलवाल्यांना दणका; स्टंटबाजांचं मीम बनवून केलं ट्रोल

IND vs NZ: किवी सलामीवीरांचा धमाका! 27 वर्षांनंतर भारतीय भूमीवर रचला ऐतिहासिक रेकॉर्ड; कॉन्वे आणि निकोल्स जोडीची कमाल

लग्नाला गेले कुटुंब अन् एकटी मुलगी, खिडकीचे ग्रिल कापताना चोरट्यांना रंगेहाथ पकडले; पर्रा येथे दरोड्याचा मोठा डाव फसला

SCROLL FOR NEXT