CM Sawant Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant: म्हादई कदापि वळवू देणार नाही; स्टार महिला पुरस्कार प्रदान सोहळ्यात सावंत यांचा पुनरुच्चार

अन्यथा ‘जीवनगौरव’ निरुपयोगी : हेमा सरदेसाई

गोमन्तक डिजिटल टीम

CM Pramod Sawant म्हादई नदी वाचविण्यासाठी शक्य त्या सर्व गोष्टी करण्‍यात आल्‍या आहेत आणि केल्‍या जात आहेत. म्हादई ही समस्‍त गोमंतकीयांची माता आहे. त्‍यामुळे या नदीचे पाणी कोणत्याही स्थितीत वळवू देणार नाही, असा पुनरुच्चार मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज केला.

गोवा पंचायत महिला शक्ती अभियानातर्फे आयोजित ‘गोवा स्टार महिला पुरस्कार -२०२३’ वितरण सोहळ्‍यात ‘जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित लोकप्रिय गायिका हेमा सरदेसाई यांनी अचानक मुख्यमंत्र्यांना म्हादईबाबत प्रश्न विचारून सर्वांनाच आश्‍चर्याचा धक्का दिला.

त्‍या म्‍हणाल्‍या, ‘जर ते म्हादई नदी वाचवू शकले नाहीत तर हा पुरस्कार निरुपयोगी आहे. म्हादई नदी वाचविण्याच्या आमच्‍या मिशनला मुख्‍यमंत्र्यांनी पाठिंबा द्यावा.’

मिशन यशस्वी

पंचायत आणि नगरपालिका क्षेत्रात 33 टक्के आरक्षण बाजूला सारून ज्या महिला निवडून येत आहेत, त्या त्यांच्या मेहनतीमुळे व सामाजिक योगदानामुळे. महिलांच्या सहभागामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘स्वच्छ भारत’ उपक्रम यशस्वी झाला व ‘स्वयंपूर्ण गोवा’ मिशनही यशस्वी होत आहे. - डॉ. प्रमोद सावंत, मुख्‍यमंत्री

यांना मिळाला पुरस्कार :

गोवा स्टार वुमन्स अवार्ड 2023 मध्ये सर्वोकृष्ट बिगर सरकार संस्था गोवा सुधारो यांना पुरस्कार प्राप्त झाला. तर आशा वर्णेकर, गुंजन प्रभु नार्वेकर, दीपाली नाईक, प्रा. डॉ. मनस्विनी कामत, संध्या केणी माईनकर यांच्यासहित 60 महिलांना विविध क्षेत्रांतील योगदानाबाबत गौरविण्यात आले. अशा पुरस्‍कारांबाबत महिलांमध्ये जागृती करण्‍यात येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: मुख्यमंत्र्यांनी गोवा विकायला काढला? काँग्रेसच्या 'राखण यात्रे'तून प्रमोद सावंतांवर थेट हल्लाबोल; साखळीचा 'सिकंदर' कोण? 

Goa ST Political Reservation: 'आता फसवणूक सहन करणार नाही!' 2027 च्या निवडणुकीपूर्वी एसटी समाजाला आरक्षण द्या; गोव्यात आंदोलनाचा एल्गार

Mhadei Water Dispute: केंद्राला पत्र पुरे, कोर्टाकडून पाहणीचा आदेश मिळवा! म्हादईचा लढा निर्णायक वळणावर; संयुक्त पाहणीसाठी गोव्याचा मोठा डाव

खरी कुजबुज: ...अन् त्‍यांच्‍या काळजात धस्स!

Jantar Mantar Protest: ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याच्या मागणीने धरला जोर! NEET प्रकरणानंतर आता निवडणूक आयोगावर निशाणा; 10 ऑक्टोबरपासून 'जंतरमंतर 2.0' आंदोलनाची घोषणा

SCROLL FOR NEXT