Raksha Bandhan Jit Arolkar Dainik Gomantak
गोवा

Raksha Bandhan : आमदार जीत आरोलकरांचं रक्षाबंधनाला अनोखं गिफ्ट

बहिणीला ओवाळणीमध्ये दिला तिरंगा भेट; जीत आरोलकरांच्या रक्षाबंधनाची सर्वत्र चर्चा

आदित्य जोशी

Raksha Bandhan : रक्षाबंधनानिमित्त आज देशभरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. गोव्यातही आज मोठ्या उत्साहात राखी पौर्णिमेचा सण साजरा केला जात आहे. शाळा-कॉलेजमध्येही रक्षाबंधनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. मात्र या सगळ्यात सध्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांच्या अनोख्या रक्षाबंधनाची सर्वत्र चर्चा सुरु आहे.

आमदार जीत आरोलकर यांनी आपल्या घरी रक्षाबंधनाचा सण साजरा केला. बहिणीने औक्षण करुन राखी बांधल्यावर जीत आरोलकरांनी बहिणीला अनोखं गिफ्ट दिलं आहे. जीत यांनी आपल्या बहिणीला तिरंगा भेट दिला आहे. सध्या सर्वत्र स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर हर भर तिरंगा मोहीम राबवली जात आहे. त्याच धर्तीवर जीत आरोलकर यांनी आपल्या बहिणीला तिरंगा भेट देत एक आदर्श घालून दिला आहे.

दरम्यान समर्थक असो वा विरोधक; सर्वांची कामं करणार असल्याचं मगोपचे मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी म्हटलं आहे. पंचायत निवडणुकीसाठी मतदान केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना आरोलकर यांनी स्थानिक राजकारणावरही भाष्य केलं आहे.

ग्रामपंचायत निवडणूक म्हणजे गावातील सर्वसामान्य लोकांची निवडणूक असते. ही काही विधानसभा, लोकसभा निवडणूक नाही. त्यामुळे यात आपला दुसरा असं काही नसतं. सगळे आपल्यासाठी समान असून जेवढे लोक पंच म्हणून निवडून येतील त्यांची आमदार या नात्याने काम करण्याची आपली जबाबदारी असल्याचंही जीत आरोलकर यांनी स्पष्ट केलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Under 23 Cricket: युवक संघासाठी टी-20 क्रिकेट स्पर्धा; गोव्याच्या 23 वर्षांखालील संघाचा एलिट ड गटात समावेश

आरोप निश्चितीपूर्वी आरोपीची बाजू ऐकून घेणे बंधनकारक; उच्च न्‍यायालयाकडून सत्र न्यायालयाचा आदेश रद्द

Illegal Massage Parlours: मसाज पार्लरविरोधात लोबोंचे पत्र; कळंगुटमध्ये बेकायदा आस्थापने सुरू असल्याचे नमूद

Bhumi Pednekar: 'मी मूळची पेडण्याची, मला गोव्याची असल्याचा नेहमीच अभिमान वाटतो'; अभिनेत्री भूमी पेडणेकरनं सांगितलं गोवा कनेक्शन

RGP Controversy: ‘त्‍या’ दहाजणांचे निलंबन मागे; आरजीपीचे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष बोरकर यांच्‍याकडून आदेश जारी

SCROLL FOR NEXT