MGNREGA Wages Dainik Gomantak
गोवा

MGNREGA Wages: केंद्र सरकारचा मोठा निर्णय, गोव्यातील मनरेगा कामगारांच्या वेतनात वाढ

Goa Rural Employment Scheme : राज्यातील मनरेगा कामगारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारनं ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत मजुरांच्या मजुरीमध्ये वाढ करण्याची घोषणा केली आहे.

Sameer Amunekar

पणजी: राज्यातील मनरेगा कामगारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारनं ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत मजुरांच्या मजुरीमध्ये वाढ करण्याची घोषणा केली आहे. केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयानं महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने (मनरेगा) अंतर्गत मजुरीच्या दरांमध्ये सुधारणा करण्याची घोषणा करण्यात आली आहे.

मनरेगा अंतर्गत काम करणाऱ्या मजुरांना दरवर्षी वेतन दरांमध्ये सुधारणा मिळावी म्हणून सरकार प्रयत्नशील असते. विविध राज्यांमध्ये वेतन दरात वाढ करण्यात आली आहे. यामुळे ग्रामीण भागातील मजुरांचे जीवनमान सुधारण्यास मदत होईल, तसेच त्यांना अधिक आर्थिक स्थैर्य मिळण्याची अपेक्षा आहे.

केंद्र सरकारने अधिसूचित केल्याप्रमाणे गोव्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत प्रतिदिन वेतन ३७८ रुपये असणार आहे. केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाच्या पूर्वीच्या अधिसूचनेत या संदर्भात सुधारणा करण्यात आली आहे.

MGNREGA Wages

२०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी संपूर्ण देशात १०.५६ टक्के कमाल वेतनवाढ अधिसूचित केली होती. त्यावेळी जारी केलेल्या अधिसूचनेत, गोव्यात अकुशल कामगारांसाठीचा वेतन दर प्रतिदिन ३२२ रुपयांवरून ३५६ रुपये करण्यात आला होता.

सरकारच्या या निर्णयामुळे लाखो ग्रामीण कामगारांना फायदा होईल. ही वेतन वाढ गरिबी कमी करण्यासाठी आणि ग्रामीण भागातील लोकांना आर्थिक मदतीचा हात देण्यासाठी एक सकारात्मक पाऊल आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Municipal Election: पालिका प्रभागरचनेची घाई; सरकार-निवडणूक आयोग आमनेसामने, '24 तासांत काम कसे करणार?'

Goa Crime: 11 वर्षे शौचालयाखाली दडले होते खुनाचे रहस्य; खोदकामात सांगाडा सापडला, अखेर पुराव्याअभावी संशयित निर्दोष

Rohit Sharma: 'मला घरी बोलावलं, अर्धा तास माझ्यासोबत...' रोहित शर्माबाबत स्टार क्रिकेटपटूचं मोठं वक्तव्य; सांगितली संपूर्ण कहाणी

GST Collection: गोव्यात पाच महिन्यांत 1,143 कोटींचा जीएसटी जमा; 20,960 सक्रिय करदाते, कॅसिनोंबाबतही मोठी स्पष्टता

Team India ODI Series: 2027 वनडे वर्ल्ड कपआधी टीम इंडियाची अग्निपरीक्षा! न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिकेसह 'या' संघांविरुद्ध होणार सामने; पाहा संपूर्ण वेळापत्रक

SCROLL FOR NEXT