Goa Weather Updates Dainik Gomantak
गोवा

Goa Weather Updates : हवामान विभागाचा इशारा; पुढील दोन दिवस असा असणार तापमानाचा पारा

22 ते 24 एप्रिल या कालावधीत तापमानात वाढ होण्याची शक्यता

दैनिक गोमन्तक डिजिटल

राज्यात पुढील दोन दिवस तापमानवाढीची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. 22 ते 24 एप्रिल या कालावधीत तापमानात 2 अंश सेल्सियस वाढ होऊ शकते. त्यामुळे पारा 36 अंश सेल्सियसपर्यंत जाऊ शकतो.

उष्म्याचे प्रमाण कमी जास्त असले, तरी आर्द्रता वाढल्यामुळे अंगातून घामाच्या धारा वाहत आहेत. राज्यात काही ठिकाणी तुरळक सरी कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

राज्याच्या काही भागांत यापूर्वीही तुरळक सरी कोसळल्या आहेत. परंतु राजधानी व इतर परिसरात नागरिकांना अधून-मधून केवळ ढगाळ वातावरणाचा अनुभव येत आहे. त्यातच उष्मा अधून-मधून वाढत असल्याने अंगाची लाही लाही होत आहे.

ढगाळ वातावरणामुळे पाऊस पडणार आणि वातावरण आल्हाददायक होणार, अशी अटकळ बांधलेल्या लोकांची पुरती निराशा होत आहे.

मात्र, पुढील दोन दिवस तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे. गुरुवारी राजधानी पणजीत किमान तापमान 35 तर कमाल तापमान 27 अंश सेल्सियस नोंदवण्यात आले. या कालावधीत पुरेसे पाणी पिणे, बाहेर काम करताना पुरेशी विश्रांती घेणे आणि बालक व वयोवृद्धांची काळजी घेण्याचे आवाहन हवामान खात्याने केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT