Khazan farming Technology Dainik Gomantak
गोवा

Khazan Farming: एकात्मिक शेती पीक: मेरशीतील खाजन शेतीत अभिनव प्रयोग, आयसीएआरच्या ‘लँड-शेपिंग’ मॉडेलचा वापर

Khazan farming Technology: एकात्मिक शेती पद्धती आणि कल्पक ‘लँड-शेपिंग’ तंत्रज्ञानाचा वापर करून मेरशी येथील ज्योकिम डिसोझा यांनी खाजन जमिनीत पीक घेण्याचा प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: एकात्मिक शेती पद्धती आणि कल्पक ‘लँड-शेपिंग’ तंत्रज्ञानाचा वापर करून मेरशी येथील ज्योकिम डिसोझा यांनी खाजन जमिनीत पीक घेण्याचा प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे. केंद्रीय किनारी कृषी अनुसंधान संस्थेच्या सहकार्याने त्यांनी क्षारयुक्त खाजन जमिनीत विविध पिके घेतली आहेत. त्यांच्या या प्रयोगाची दखल घेऊन मेरशी परिसरातील आणखी काही शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानाद्वारे किफायतशीर शेती केली आहे.

किनारी भागातील क्षारयुक्त आणि आम्लयुक्त जमिनीच्या शाश्वत व्यवस्थापनासाठी ‘लँड-शेपिंग’ हे मॉडेल केंद्रीय किनारी कृषी अनुसंधान संस्थेने विकसित करण्यात आले आहे. या मॉडेलसाठी नाबार्ड व गोवा चेंबर ऑफ कॉमर्सचे आर्थिक सहकार्य लाभले आहे.

या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे खाजन जमिनीची उत्पादकता वाढली आहे, शेतकऱ्यांच्या मिळकतीत वाढ झाली असल्याचे आयसीएआरचे शास्त्रज्ञ डॉ. गोपाळ महाजन यांनी सांगितले. ते मेरशी येथील खाजन शेतीतील तंत्रज्ञानाच्या आधारे एकात्मिक पीक पद्धतीची माहिती देताना बोलत होते.

यावेळी या उपक्रमाला नाबार्ड, गोवा चेंबर ऑफ कॉमर्सच्या कृषी समितीचे अध्यक्ष महेश पाटील, उद्योजक डॉ. संगम कुऱ्हाडे, शास्त्रज्ञ त्रिवेश मयेकर, संचालक शर्मिला मोतेंरो, नाबार्डचे अधिकारी, कृषी अधिकारी, शेतकरी ज्योकीम डिसोझा व इतर उपस्थित होते. दरम्यान, यावेळी झायकॉन रिन्यू एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड आणि आयसीएआर-सीसीएआरआय यांच्यात सेंद्रिय खतावरील संशोधनासाठी सामंजस्य करार करण्यात आला.

पाणी साठवण्यासाठी तळ्याचा उपयोग

खाजन शेतीतील तळ्याचा उपयोग पावसाचे पाणी साठवण्यासाठी आणि गोड्या पाण्यातील मत्स्यपालनासाठी होत आहे, तर उंच बंधाऱ्यांवर उच्च मूल्याच्या पिकांची लागवड केली जात आहे. गोव्याच्या खाजण परिसंस्थेत उपजीविकेची सुरक्षा वाढवणे आणि शाश्वत संसाधन व्यवस्थापन सुनिश्चित करणे या उद्देशाने नाबार्डच्या आर्थिक पाठबळावर आयसीएआर-सीसीएआरआयच्या बहुविद्याशाखीय पथकाने हे तंत्रज्ञान विकसित केले आहे.

वैज्ञानिक नियोजनानुसार जमिनीची रचना

एकात्मिक शेतीच्या माध्यमातून भातशेती, बागायती पिके, चारा उत्पादन, पर्जन्यजल संवर्धन आणि मत्स्यपालन यांचा मेळ घालण्यात आला आहे. शास्त्रज्ञांनी केलेल्या वैज्ञानिक नियोजनानुसार या जमिनीची रचना ही १० टक्के क्षेत्र शेततळे, २५ टक्के क्षेत्र उंच बंधारे, ६५ टक्के क्षेत्र अनुकूलित लागवड क्षेत्र या स्वरूपात बदलण्यात आले. जमिनीतील आम्लतेचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि सुपीकता सुधारण्यासाठी चुना आणि रॉक फॉस्फेटचा वापर करण्यात आला. यामुळे आता या जमिनीत वर्षभर शेती करणे आणि एकापेक्षा जास्त पिके घेणे शक्य झाले असल्याचे डॉ. महाजन यांनी सांगितले.

‘इतर शेतकऱ्यांनीही पुढे यावे’

हा प्रकल्प गोव्यातील पडीक किंवा कमी वापरात असलेल्या किनारी भागाला उत्पादक आणि फायदेशीर शेतीत बदलू शकतो, याचे हे एक उत्तम आणि अनुकरणीय उदाहरण ठरले आहे. ‘लँड-शेपिंग’ या तंत्रज्ञानाचा वापर करत राज्यातील इतर शेतकऱ्यांनी देखील शेती करावी, असे आवाहन महेश पाटील यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT