Indian Railway Rules Dainik Gomantak
गोवा

Indian Railway: नव्या वर्षात ‘कोरे’चे भारतीय रेल्वेत विलिनीकरण

Indian Railway: राज्यांना परतावा मिळेना : पुरेशा साधनसुविधांचा अभाव; विकासाचा तर पत्ताच नाही

दैनिक गोमन्तक

Indian Railway: कोकण रेल्वे महामंडळ भारतीय रेल्वेत विलीन करण्याची चर्चा उच्च पातळीवर सुरू झाली आहे. येत्या आर्थिक वर्षाच्या सुरवातीला त्याबाबतचा निर्णय अधिकृतपणे होण्याची शक्यता आहे. महामंडळातील उच्चपदस्थ सूत्रांनी या माहितीला दुजोरा दिला आहे.

कोकण रेल्वे ‘बांधा-वापरा-हस्तांतरित करा’ तत्त्वावर सुरु केली होती. त्यातील ‘बांधा’ टप्पा 1998 साली पूर्ण झाला. तेव्हापासून ‘वापरा’ टप्पा सुरू आहे. या उभारणीत भारतीय रेल्वेचा 51 टक्के, महाराष्ट्र सरकार २२ टक्के, कर्नाटक सरकार १५ टक्के,

गोवा सरकार 6 टक्के व केरळ सरकार 6 टक्के असा आर्थिक सहभाग आहे. या सर्व राज्य सरकारांना कोकण रेल्वेकडून कोणताही परतावा मिळत नसल्याने आता ती रेल्वेत विलीन करा असा विचार सुरू झाला आहे.

आर्थिक उत्पन्नाचे स्रोत मर्यादित

सध्या कोकण रेल्वेच्या अखत्यारित उरण, वास्को (मुरगाव) किंवा मंगळुरू यापैकी एकही बंदर नसल्यामुळे आयात-निर्यात व्यवसायातून होणाऱ्या मालवाहतुकीचे उत्पन्न कोकण रेल्वेला मिळू शकत नाही.

नवीन होणारे दिघी बंदरही रोहा-दिघी मार्गामुळे मध्य रेल्वेकडेच जाण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे कोकण रेल्वेची मालवाहतुकीची मदार केवळ इतर विभागांतून येणाऱ्या गाड्या, बाळ्ळी येथील मल्टिमॉडेल लॉजिस्टिक पार्क, नव्याने उभे राहिलेले रत्नागिरीतील शीतगृह एवढ्यावरच आहे.

याबाबत सध्या माझ्या पातळीवर कोणतीच माहिती नाही. सरकारच्या पातळीवर योग्य तो निर्णय कधीही होऊ शकतो. यापूर्वी विलिनीकरण नको असा निर्णय झाला होता, तेवढेच मला माहीत आहे. -
संजय गुप्ता, अध्यक्ष, कोकण रेल्वे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Athletics: "हुकमी पदकविजेती, पण खिशात पैसे नाहीत!" साक्षी काळेची धाव आता आर्थिक अडचणींच्या ट्रॅकवर; आशियाई पॅरा गेम्समधील सहभागही टांगणीला

Margao Merchant Association: मडगावात पिंपळकट्ट्यावर भिकाऱ्यांचा उच्छाद, दारु पिऊन धिंगाणा; न्यू मार्केट व्यापारी संघटनेचा संताप

गोव्यात पर्यटकांच्या जिवाशी खेळ! समुद्रकिनारी बेदरकार गाडी चालवणं कोल्हापूरच्या पर्यटकाला पडलं महाग; पोलिसांनी दाखवला इंगा

नोकरी मागे धावण्यापेक्षा उद्योजक बना! स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याची गोमंतकीय तरुणांना सुवर्णसंधी; मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजनेचे विशेष पाऊल

Goa Petrol Stock Status: गोव्यात मुबलक इंधनसाठा! अफवांवर विश्वास न ठेवण्याचं पेट्रोल डीलर असोसिएशनचं आवाहन; नरहर ठाकूर यांनी स्पष्टचं सांगितलं

SCROLL FOR NEXT