Banastarim Bridge Accident Mercedes Driver arrested Dainik Gomantak
गोवा

Banastarim Bridge Accident: बाणास्तरी अपघातातील मर्सिडीजच्या चालकाला अटक

अपघातात तिघांचा मृत्यू, तर 7 जण जखमी

गोमंतक ऑनलाईन टीम

Banastarim Bridge Accident: बाणास्तरी पुलावर झालेल्या भीषण अपघाताला कारणीभूत ठरलेल्या मर्सिडीज कारच्या चालकाला अटक करण्यात आली आहे. मार्दोळ पोलिसांनी पहाटे या चालकाला अटक केली. परेश ए. सिनाई सावर्डेकर असे त्याचे नाव आहे.

मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे गाडी चालवून तिघांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या सावर्डेकर याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. निष्काळजीपणे गाडी चालवून त्याने सात जणांना जखमीही केले.

फोंड्याहून ही मर्सडीज  (जीए - 07- के - 7311)  भरधाव वेगाने आली. मर्सिडीजने तीन दुचाक्यांना ठोकर दिली, त्यानंतर दोन आल्टो व स्वीफ्ट कारला धडक दिली आणि त्यानंतर ती गाडी दुभाजकावर स्थिरावली. या काळातही चालकाला अपघात घडला याचे भानही नव्हते. त्यामुळेच पाच, सहा गाड्यांना मर्सिडीज चालकाने ठोकरले.

या अपघातात एका दांपत्यांचा मृत्यू झाल्याने त्यांची दोन मुले पोरकी झाली. या अपघातात वनिता भंडारी (२१, रा. सांताक्रूझ-फोंडा), शंकर हळर्णकर (६७, रा. बाणास्तरी), राज माजगावकर (२७, रा. ताळगाव) हे गंभीर जखमी झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

Goa Agriculture: कोकमला अवकाळी पावसाचा फटका, लागवड क्षेत्रात सातत्याने वाढ; हवामान बदलाने उत्पादनात चढ-उतार

Goa Weather: गोव्यात उन्हाचा तडाखा अन् सत्तरी-साखळीत वादळी पाऊस; पुढील 4-5 दिवस उष्मा कायम राहणार

Tourist Safety: दलालांवर 'ड्रोन'ची नजर, एआयने आवळणार फास; 'बीच व्हिजिल ॲप'ही होणार अपग्रेडच, पर्यटनमंत्र्यांची माहिती

SCROLL FOR NEXT