Goa Accident Daink Gomantak
गोवा

Goa Accident: अपघात नव्हे घातपात! कन्‍हैया कुमारच्या शरीरावर आढळल्या वाराचे निशाण, फोंडा पोलिस संशयाच्‍या घेऱ्यात

Goa Accident Case: कन्‍हैयाकुमार हा फाेंडा येथील मारुती मंदिराजवळील झोपडपट्टीत राहात हाेता. ताे काहीसा मनोरुग्‍ण हाेता.

गोमन्तक डिजिटल टीम

हणजूण आणि काेलवा पाेलिसांनंतर आता कदाचित फोंडा पोलिसही संशयाच्‍या घेऱ्यात येण्‍याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

२५ जून राेजी लोटली येथे वेर्णा औद्याेगिक वसाहतीजवळ कन्‍हैयाकुमार मोंडल (वय ३२ वर्षे) याचा अपघाती मृत्‍यू असा गुन्‍हा मायणा-कुडतरी पाेलिसांनी नोंदविला असला तरी मृतदेहाच्‍या मानेवर आणि पोटावर तीक्ष्‍ण हत्‍याराने वार केल्‍याचे दिसून आल्‍याने हा घातपाताचा प्रक़ार असण्‍याची शक्‍यता बळावली आहे.

२५ जून राेजी लोटली येथे वेर्णा औद्याेगिक वसाहतीजवळ या इसमाचा मृतदेह सापडला हाेता. मायणा-कुडतरी पोलिसांनी सुरुवातीला हा ‘हिट ॲण्‍ड रन’ अपघात असे नाेंद करीत अपघाती मृत्‍यूची केस नाेंद केली हाेती.

मात्र, या मृतदेहाची उत्तरीय तपासणी केल्‍यानंतर त्‍याच्‍या मानेवर तीन, पाेटावर दोन तसेच हातावर दोन तीक्ष्‍ण हत्‍याराने वार केल्‍याचे आढळून आले. शिवाय त्‍याचा एक कान कापलेल्‍या अवस्‍थेत होता. यासंबंधीचा अहवाल दक्षिण गाेवा जिल्‍हा इस्‍पितळातून मायणा-कुडतरी पाेलिसांना सादर केला आहे.

यासंदर्भात मडगावचे उपअधीक्षक संतोष देसाई यांना विचारले असता, उत्तरीय तपासणी अहवालात या जखमा आढळल्‍या आहेत. मात्र, या जखमा कुणी वार केल्‍यामुळे झाल्‍या, की वाहनाचा धक्‍का बसून झाल्‍या याचा आम्‍ही तपास करीत आहाेत. अद्याप हे प्रक़रण अपघाती मृत्‍यू म्‍हणूनच नोंद आहे.

कन्‍हैयाकुमार याला फाेंडा पोलिसांच्‍या रॉबर्ट व्‍हॅनने लाेटली येथे आणून सोडले होते, अशी माहिती प्राप्‍त झाली आहे. यासंदर्भात मायणा-कुडतरी पाेलिसांनी रॉबर्ट व्‍हॅनचालकाची जबानीही नोंद केली आहे. त्‍यात त्‍याने एका हवालदाराच्‍या सांगण्‍यावरून कन्‍हैयाकुमारला लाेटली येथे आणून सोडले, असे सांगितले.

सूत्रांकडून मिळालेल्‍या माहितीनुसार, कन्‍हैयाकुमार हा फाेंडा येथील मारुती मंदिराजवळील झोपडपट्टीत राहात हाेता. ताे काहीसा मनोरुग्‍ण हाेता. २५ जूनच्‍या आदल्‍या रात्री तो रस्‍त्‍यावरील वाहनचालकांना त्रास देतो, अशी तक्रार फोंडा पोलिसांकडे आल्‍यानंतर त्‍याला रॉबर्ट व्‍हॅनमध्‍ये कोंबून लोटली येथे आणून सोडले होते.

मात्र, हा इसम जर फाेंड्याचा हाेता, तर त्‍याला घरी नेऊन न सोडता लाेटली येथे का सोडले आणि त्‍याला सोडल्‍यानंतर त्‍यांच्‍या अंगावर या जीवघेण्‍या जखमा कशा आढळल्या, असे प्रश्‍न निर्माण झाले आहेत.

पोलिसांनीच कन्‍हैयाकुमारला लोटलीत आणून सोडले

विशेष बाब म्‍हणजे, कन्‍हैयाकुमार हा फाेंडा बाजारात राहणारा असून त्‍याला लोटली येथे फोंडा पोलिसांच्‍याच राॅबर्ट गाडीतून लाेटलीत आणून सोडले होते, अशी धक्‍कादायक माहिती पुढे आली आहे. पाेलिसांनी त्‍याला अशा अनाेळखी जागी का आणून सोडले आणि त्‍यानंतर त्‍याची हत्‍या कशी झाली, हे प्रश्‍न आता ऐरणीवर आले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT