South Goa Constituency :  Dainik Gomantak
गोवा

South Goa Constituency : दक्षिणेतील वीसही मतदारसंघात भेटीगाठी : दिगंबर कामत

South Goa Constituency : पहिल्या फेरीत भाजप कार्यकर्त्यांत उत्साह

गोमन्तक डिजिटल टीम

South Goa Constituency :

सासष्टी, लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या दक्षिण गोवा मतदारसंघातील उमेदवार पल्लवी धेंपे यांनी वीसही मतदारसंघांतील कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन पहिली फेरी आज संपवली. या फेरीत भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसला.

त्याच बरोबर सर्वच मतदारसंघांमध्ये चांगला प्रतिसाद लाभला, असे मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी आज सांगितले.

कोलवा येथील श्री महालक्ष्मी मंदिरातील कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर ते बोलत होते. पहिल्या फेरीत वीसही मतदारसंघांतील कार्यकर्त्यांकडे संपर्क साधण्यात आला व उमेदवार पल्लवी धेंपे यांची ओळख करुन देण्यात आली.

आज संध्याकाळी उमेदवार पल्लवी धेंपे यांनी आमदार दिगंबर कामत, माजी खासदार विनय तेंडुलकर, सरचिटणीस दामू नाईक, दक्षिण गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष सुवर्णा तेंडुलकर यांच्या समवेत प्रथम बाणावली व नंतर कुडतरी मतदार संघाचा दौरा केला. सरपंच पियो फर्नांडिस, उपसरपंच, पंच उपस्थित होते. या वेळी प्रेमानंद लोटलीकर व रोनी तावारीस या तियात्रिस्टांचा गौरव करण्यात आला.

कोलवा येथे पल्लवी धेंपे म्हणाल्या, पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने लोकोपयोगी योजना राबवल्या. त्यामुळे विकास मोठ्या प्रमाणात झाला आहे.

कुडतरी, मायणा परिसरात दौरा

पल्लवी धेंपे यांनी आज कुडतरीचा दौरा केला. त्यानंतर राय येथील अवर लेडी ऑफ स्नो चर्चला भेट दिली.

त्यानंतर मायणा कुडतरीतील आलेग्रिया ओपन एअर सभागृहात कुडतरी मतदारसंघातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले व नंतर कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्सो यांच्यासह कार्यकर्ते व चाहत्यांना सांतेमळ देवस्थान मंडपात मार्गदर्शन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Electricity: गोव्यातील वीज ग्राहकांसाठी गूड न्यूज! वीज बिलाचा शॉक टळला; 137 कोटींची तूट सावंत सरकार भरुन काढणार

Goa Air Pollution: वास्को आणि डिचोलीत वाढला प्रदूषणाचा धोका! हवेची गुणवत्ता चिंताजनक पातळीवर; राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचा धडकी भरवणारा रिपोर्ट

Narendra Sawaikar Post Controversy: 'झुरळांसह वाळवी, देशाला वाचवा'... भाजप नेत्याच्या पोस्टने गोव्यात खळबळ; नरेंद्र सावईकर यांच्या विधानावर विरोधकांचा हल्लाबोल!

Candolim Illegal Road Widening: सलमान खानच्या प्रकल्पासाठी बेकायदेशीर रुंदीकरण? आमदार मायकल लोबो अडचणीत; कांदोळीतील नागरिकांचा खळबळजनक आरोप

Advocate Ankur Kumar Attack: पोलिसांना निष्काळजीपणा भोवणार! वकील अंकुर कुमार हल्ल्याप्रकरणी हायकोर्ट संतापले; दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध 24 तासात चौकशी सुरु करा

SCROLL FOR NEXT