Margao Municipality Dainik Gomantak
गोवा

मडगाव पालिका बैठकीला सत्ताधाऱ्यांचीच दांडी

भाडेपट्टी करार प्रकरण: मडगाव नगराध्यक्षांवर सभा तहकुबीची वेळ

दैनिक गोमन्तक

मडगाव: गांधी मार्केटमधील दोन दुकानांच्या भाडेपट्टी करारासंदर्भात चर्चा करण्यासाठी सोळा नगरसेवकांनी केलेल्या मागणीवरून बोलावलेली मडगाव पालिकेची खास बैठक कोरम अभावी तहकूब करण्याची वेळ नगराध्यक्षांवर ओढवली.

उपनगराध्यक्षांसह सत्ताधारी गटातील बहुसंख्य नगरसेवक बैठकीस उपस्थित नव्हते व त्यामुळे एक प्रकारे सदर भाडेपट्टीप्रकरणी विरोधी सदस्यांनी केलेल्या आरोपात तथ्य असल्याचा दावा त्यांनी केला. ही बैठक सकाळी 11 वा. बोलावलेली होती व त्या प्रमाणे मुख्याधिकारी आग्नेलो फर्नांडिस वेळेवर सभागृहात उपस्थित झाले.

नगरसेवक घनश्याम शिरोडकर,महेश आमोणकर, सदानंद नाईक,बबीता नाईक, पराडकर, लोटलीकर, कामील बार्रेटो व विरोधी गटाचे अन्य नगरसेवक आले. नंतर काही वेळाने नगराध्यक्ष लिंडन परेराही आले. पण कोरम भरला नसल्याने त्यांनी 20 मिनिटे वाट पाहिली व नंतर कोरम नसल्याचे सांगून त्यांनी बैठक तहकूब केली. यावेळी कामील बार्रेटो व महेश आमोणकर यांनी विषयसूचीवरील एका विषयाबाबत नगराध्यक्षांकडे स्पष्टीकरण मागितले, पण बैठक तहकूब केल्याचे सांगून ते निघून गेले. नंतर त्यांनी तोच मुद्दा मुख्याधिकाऱ्यांकडे उपस्थित केला, पण त्यांनी त्यावर बोलणे टाळले.

नंतर पत्रकारांशी बोलताना कामील बार्रेटो व महेश आमोणकर यांनी बाजार समितीच्या अध्यक्ष असलेल्या उपनगराध्यक्षांसह सदर समितीच्या अन्य सदस्यांनी बैठकीस उपस्थित न रहाणे यावरून या एकंदर प्रकरणात ते सर्व सामील आहेत, हे सिध्द होत असल्याचा आरोप केला. बैठकीची मागणी करणाऱ्या सोळा जणांतील दोघांची नावे नंतर त्या पत्रावरून खोडली गेली आहेत, ती कोणी खोडली, असा मुद्दाही उपस्थित केला गेला व त्यांच्यावर आलेल्या दडपणातून हा प्रकार झाला असावा, असा संशय त्यांनी व्यक्त केला.

भाडेपट्टीसंबंधी संबंधितांनी बैठकीस उपस्थित राहून त्याबाबत स्पष्टीकरण द्यायला हवे होते, असे काही नगरसेवकांनी म्हटले. या प्रकरणी दक्षता खात्याकडे सोपवण्याची मागणी करणार असल्याचे घनश्‍याम शिरोडकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Hadfade Birch Fire Case: कोर्टाचा आदेश धुडकावणे सचिवांना पडले महाग! बर्च अग्निकांड प्रकरणी 4 ग्रामपंचायतींने उत्तर दाखल न केल्याने हजेरीचे निर्देश

Meta Apology: मोदी सरकार आक्रमक होताच मार्क झुकेरबर्ग नमले! पंतप्रधान मोदींचा व्हिडिओ हटवल्याप्रकरणी अन् बाललैंगिक मजकुरावर 'मेटा'कडून माफी

Goa PWD Workers Regularisation: 1,399 ‘PWD’ कामगारांना हायकोर्टचा मोठा दिलासा; 9 फेब्रुवारी 2021 पासून सेवेत, वरिष्ठता आणि निवृत्तीवेतनाचे सर्व लाभ देण्याचे स्पष्ट निर्देश

Vijay Sardesai Congress: काँग्रेसच्या 'हाता'वर पुन्हा विश्वास ठेवायला गोवा फॉरवर्डचा 'नारळ' तयार नाही! पक्षाध्यक्ष विजय सरदेसाई यांचा स्वबळावर लढण्याचा इशारा

Swiggy Warehouse Fraud Goa: बनावट नोंदीद्वारे ‘स्विगी’च्या कर्मचाऱ्यांनीच लुटले गोदाम; 93 लाखांचा ऐवज लांबविला, वेर्णा पोलिसांकडून गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT