Goa Assembly  Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly: गोवा विधिमंडळ फोरमने बोलावली बैठक; 'या' विषयांवर होणार चर्चा

खासदार, मंत्री, आजी माजी आमदार होणार सहभागी

Rajat Sawant

Goa Assembly: गोवा विधिमंडळ फोरमने म्हादई आणि जमीन महसूल विषयांवर खासदार, मंत्री, आजी माजी आमदार यांची संयुक्त बैठक बोलावली आहे. ही बैठक 27 जानेवारी रोजी सकाळी 10:30 वाजता पीएसी सभागृहात बोलावली आहे.

म्हादई आणि जमीन महसूल विषय हिवाळी अधिवेशनादरम्यान सभागृहात उपस्थित करण्यात आले होते. त्यानंतर 27 जानेवारी रोजी गोवा विधिमंडळ फोरमने या प्रश्नावर बैठक बोलावली आहे.

म्हादई नदीचे पाणी वळवण्यावरून गेल्या काही दिवसांमध्ये गोव्यात राजकारण चांगलेच तापले असताना काल यावर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आडमुठेपणा घेत मत व्यक्त केले होते.

आम्हाला केंद्र सरकारकडून डीपीआर मंजुरी मिळाल्यामुळे आम्ही आता लवकरच म्हादई प्रकल्पाचे काम सुरू करणार आहोत. याबाबत गोव्याने कितीही प्रयत्न केले तरी आम्हाला कोणताच फरक पडणार नसून लवादाच्या निवाड्याप्रमाणेच आम्ही प्रकल्पांचे काम हाती घेतले आहे असे त्यांनी सांगितले होते.

दरम्यान, विधानसभा सभागृहात चर्चेअंती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी म्हादईप्रश्नी जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांच्या अध्यक्षतेखाली विधानसभा सभागृह समिती स्थापन केली.

जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या सभागृह समितीत आमदार कार्लुस फेरेरा, विजय सरदेसाई, व्हेंझी व्हिएगस, वीरेश बोरकर, डॉ. चंद्रकांत शेट्ये, आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, दिव्या राणे, गणेश गावकर, प्रेमेंद्र शेट, जीत आरोलकर आणि मायकल लोबो यांचा समावेश आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जाहीर केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Nightclub Fire: 'रोमिओ लेन' क्लबचे 18 महिने बेकायदेशीर ऑपरेशन; दिड वर्ष कोणाचेही लक्ष नव्हते?

Lionel Messi In India: मेस्सी आला अन् मैदानात तूफान राडा, चाहत्यांनी पाण्याच्या बाटल्या, खुर्च्या फेकल्या, टेंट उखडले, काहीजण जखमी Watch Video

'कार्यकर्त्यांना पक्षाचे नेते देव वाटत असले तरी सरकारवरील टीका रोखण्यासाठी कायद्याचा वापर करता येत नाही'; म्हापसा कोर्ट

Goa Live Updates: 'कॅश फॉर जॉब'ची राष्ट्रपतींकडून दखल

Goa Politics: खरी कुजबुज; मुख्यमंत्री झाले न्यायाधीश!

SCROLL FOR NEXT