Mining In Goa  Dainik Gomantak
गोवा

Advalpal: खाण विळख्यातून गाव वाचवा! अडवलपालवासीय ठाम, डिचोलीत होणार विशेष बैठक

Advalpal Mining: खाणप्रश्नी अडवलपालमधील लोकांचे म्हणणे जाणून घेण्यासाठी डिचोलीच्या उपजिल्हाधिकारी कार्यालयात ग्रामस्थांची एक विशेष बैठक बोलावली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Advalpal Villagers Meeting For Mining Issue

डिचोली: खाणीच्या विळख्यातून गाव वाचवा, या मागणीवर अडवलपालवासीय ठाम असून, या पार्श्वभूमीवर खाणप्रश्नी शुक्रवारी डिचोलीत होणारी बैठक तापण्याची शक्यता आहे.

खाणप्रश्नी अडवलपालमधील लोकांचे म्हणणे जाणून घेण्यासाठी दुपारी ३.३० वा. डिचोलीच्या उपजिल्हाधिकारी कार्यालयात ग्रामस्थांची एक विशेष बैठक बोलावली आहे. खाणीविरोधी लोकांची भूमिका लक्षात घेता, उद्याच्या बैठकीत लोकांचा असंतोष खदखदण्याची शक्यता नाकारता येत नाही.

डिचोलीचे उपजिल्हाधिकारी रोहन कासकर यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या बैठकीकडे अडवलपाल वासीयांसह कंपनी व्यवस्थापनाचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, अडवलपालमधील ‘फोमेंतो’ची खाण सुरू झाली असून, खाण मुद्यावर आता बैठक बोलावल्याबद्धल काही जागृत नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

दरम्यान, अडवलपाल खाण लीज क्षेत्रातील मालमत्ते संदर्भातची सुनावणी आता ६ फेब्रुवारीला होणार आहे. उत्तर गोवा अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आलेल्या नोटीसींना अनुसरून ही सुनावणी होणार आहे. नोटीसी आलेल्या लोकांनी वकिलामार्फत आपले म्हणणे उत्तर गोवा अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केले आहे.

अडवलपाल गाव संकटात

खाण व्यावसायामुळे आधीच अडवलपाल गाव संकटात असून, गावचे अस्तित्व धोक्यात आहे. खाण लीज क्षेत्रातून मंदिरे, घरां-दारांसह नैसर्गिक जलस्रोते बाहेर काढा, ही मागणी काही नवीन नाही. तरीदेखील खाण सुरू झाल्यानंतर बैठक आयोजित करण्यामागील प्रयोजन काय ते कळत नाही. गावच्या अस्तित्वासाठी डिचोलीत होणाऱ्या बैठकीत ग्रामस्थ नक्कीच आपली मागणी लावून धरणार आहेत, असे नेताजी गावकर आणि अन्य ग्रामस्थांनी सांगितले.

खाणीवर धडधड सुरू

खाण लीज क्षेत्रातून मंदिरांसह घरे-दारे आणि नैसर्गिक जलस्रोते बाहेर काढून गाव वाचवा. अशी अडवलपालमधील लोकांची सुरवातीपासूनची मागणी आहे. यापुर्वी अडवलपाल पंचायतीच्या काही ग्रामसभांनी खाणीचा विषय खदखदला आहे. खाण लीज क्षेत्रातून गाव वाचवा, असा ठरावही ग्रामस्थांनी ग्रामसभेत घेतला आहे. गेल्या रविवारी अडवलपाल- कोळमवाड्यावरील लोकांनी पंचायतीला निवेदन देऊन मंदिरासह घरे-दारे खाण लीज क्षेत्रातून बाहेर काढा, अशी मागणी केली आहे. दुसऱ्याबाजूने शिरसई-अडवलपाल खाण ब्लॉक-५ अंतर्गत येणारी अडवलपालमधील ‘फोमेंतो रिसोर्सीस’ कंपनीची खाण सुरू झाली असून, कोळमवाड्याला लागून असलेल्या या खाणीवर सध्या मशीनरींची धडधड ऐकू येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mangal Gochar: नशीब बदलणार, गरिबी हटणार! 'या' 5 भाग्यशाली राशींवर होणार पैशांचा पाऊस; 24 जुलैपासून मंगळ देवाचा महाधमाका

WhatsApp Username Feature: व्हॉट्सॲपच्या 'युझरनेम' फिचरने वापरकर्त्यांचा फायदा की सायबर गुन्हेगारांची चांदी?

Goa Politics: राजकारणात 'नव्या' पक्षांचा जुना खेळ

Goa Congress: अमित पाटकर अखेर काँग्रेस भवनात; आवश्यक दस्तऐवज संबंधित पदाधिकाऱ्याकडे सुपूर्द

Durand Cup Football: आशियातील सर्वात जुनी 135 वी 'ड्युरँड कप स्पर्धा' 25 जुलैपासून; पण सलग दुसऱ्या वर्षीही गोव्याचा एकही संघ मैदानात नाही

SCROLL FOR NEXT