Margao Municipal Council
Margao Municipal Council Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: सदानंद नाईक नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत

दैनिक गोमन्तक

मडगाव: मडगावचे आमदार दिगंबर कामत हे भाजप आले, तर त्यांच्या गटातील उमेदवार भाजप नगरसेवकांच्या पाठिंब्यावर नगराध्यक्ष म्हणून निवडून येणार अशी अपेक्षा यापूर्वी व्यक्त केली जात होती. मात्र भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक सदानंद नाईक यांनी आता स्वतः आपण नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत असल्याचे जाहीर केल्यामुळे मडगाव पालिकेच्या सत्ता संघर्षात नवीन ट्विस्ट आला आहे.

(Mayoral election in goa)

नगराध्यक्ष लिंडन परेरा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता नवीन नगराध्यक्ष निवडून काढण्यासाठी येत्या आठवड्यात निवडणूक होणार आहे. पण आता शहरात वेगळेच राजकारण शिजत असलेले संकेत मिळत आहेत. कामत यांच्या मॉडेल मडगाव गटाचे दामोदर शिरोडकर व सगुण नायक या दोघांनी स्वतः नगराध्यक्ष बनण्याची इच्छा व्यक्त केली असून स्वतंत्र गटातून घनश्याम शिरोडकर यांनी आपण नगराध्यक्ष बनण्यासाठी लॉबिंग सुरू केले आहे.

नगरपालिकेतील नऊ सदस्यीय भाजप गटाने कामत यांनी जरी काँग्रेस सोडली तरी त्यांच्या उमेदवाराला पाठिंबा न देता स्वतःचा उमेदवार उभा करण्याची घोषणा केली आहे. एवढेच नव्हे, तर भाजप गटाचे ज्येष्ठ नगरसेवक सदानंद नाईक यांनी स्वतः उमेदवारी दाखल करून असा पवित्रा घेतला आहे.

दिगंबर कामत उद्या भाजपात आले, तरी आम्ही त्यांच्या उमेदवाराला पाठिंबा देणार नाही, असे नाईक यांनी पत्रकारांना सांगितले. देशभर भाजप व काँग्रेस एकमेकांविरुध्द उभे असताना मडगाव नगराध्यक्ष निवडणुकीत ते कसे काय एकत्र येऊ शकतात, असा सवालही त्यांनी केला.

सात सदस्यीय काँग्रेस गट नगराध्यक्षपदासाठी नऊ सदस्यीय भाजप गटाची नगराध्यक्ष निवडीसाठी मदत घेऊ शकतो, अशी चर्चा असून त्या पार्श्वभूमीवर सदानंद नाईक यांच्या या वक्तव्याला महत्व प्राप्त झाले आहे. पणही त्या पदासाठी उमेदवारी अर्ज भरु शकतो, असा दावा त्यांनी केला आहे व त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दुसरीकडे मॉडेल मडगावच्या नेतृत्वाने आपल्या उमेदवार यादीची छाननी सुरु केली आहे. त्या गटाच्या नगरसेवकांची बैठक येत्या दोन तीन दिवसात बोलावली जाईल, असे सांगितले जाते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panaji: पणजीच्या पोटात दडलंय तरी काय? खोदकामात सापडली आणखी एक रहस्यमय मूर्ती

Goa Congress : निष्ठावंत कार्यकर्ते, प्रतिनिधींची वानवा; काँग्रेसची मोठी पंचाईत

Bicholim News : गोव्याच्या अस्तित्वासाठी झटणार : ॲड. रमाकांत खलप

Karnataka Sex Scandal Case : कर्नाटकातील सेक्स स्कँडल प्रकरणाचा गोव्यावर परिणाम नाही : सदानंद तानावडे

Goa Today's Live News: इंडिया आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर किमान 10-15 राज्यातील सरकार कोसळतील - पवन खेरा

SCROLL FOR NEXT