Leo Rodrigues Dainik Gomantak
गोवा

नगराध्यक्ष लिओ रॉड्रिक्स यांनी गणेश विसर्जन स्थळाची केली पाहणी

''विसर्जन स्थळी कोणत्याच प्रकारची कमतरता भासणार नाही''

दैनिक गोमन्तक

वास्को: मुरगाव पालिकेचे नगराध्यक्ष लिओ रॉड्रिक्स व नगरसेवकांनी विसर्जन स्थळाची पाहणी करून त्या ठिकाणी श्री गणेश विसर्जन करण्यास कोणत्याही प्रकारची अडचण होणार नाही याची दक्षता घेतली.

(Mayor of Mormugao Municipality Leo Rodrigues inspected the Ganesha idol immersion site)

बुधवार (दि.३१) रोजी साजरा होणाऱ्या श्री गणेश चतुर्थीची तयारी अंतिम टप्प्यावर पोचली असून घरघरात तसेच, सार्वजनिक स्थळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी तयारी चालू ठेवली आहे. वास्को सर्वत्र जय्यत तयारी सुरू आहे. दरम्यान दीड, पाच, सात, अकरा दिवसांचे गणपतीचे पूजन केल्यानंतर श्रींचे विसर्जन कृत्रिम तळीत, दर्यात विहिरीत केले जाते.

वास्को बहुतेक गणेश विसर्जन बायना समुद्रकिनारी, खारीवाडा येथे समुद्रात, वाडे तळ्यात केले जाते. या ठिकाणी शेकडो गणेश मुर्ती विसर्जित केले जातात. दरम्यान मुरगावचे नगराध्यक्ष लिओ रॉड्रिक्स तसेच नगरसेवक दीपक नाईक, उपनगराध्यक्ष अमेय चोपडेकर, नगरसेविका श्रद्धा महाले, यतिन कामुर्लेकर, रामचंद्र कामत यांनी आज सकाळी बायणा व खारीवाडा येथे समुद्रकिनारी विसर्जन स्थळाची पाहणी केली.

या ठिकाणी झालेला कचरा, वाढलेली झाडे, झुडपे कापण्याची सूचना केली. तसेच गॅमन इंडिया कंपनी अधिकाऱ्यांना विसर्जन स्थळी हाय मास्ट लाईट घालण्याची विनंती केली. त्यांनी ती मान्य केली. विसर्जन स्थळी कोणत्याच प्रकारची कमतरता भासणार नाही याची दक्षता घेणार असल्याचे नगराध्यक्ष लिओ रॉड्रिक्स यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT