Mapusa Municipal Council  Dainik Gomantak
गोवा

Mapusa Municipal Council: स्वच्छतागृह पाडणाऱ्यांवर तीन दिवसांत कारवाई; म्हापसा नगराध्यक्ष

Mapusa Public Toilet Demolition: विरोधी गटाच्या नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने नगराध्यक्षा व मुख्याधिकारी यांची भेट घेतली

गोमन्तक डिजिटल टीम

म्हापसा : कासारवाडा, खोर्ली येथील प्रभाग १८ मधील जीर्ण तथा काहीप्रमाणात वापरात असलेले स्वच्छतागृह दिवसाढवळ्या पाडण्याचा प्रयत्न झाल्याप्रकरणी सोमवारी (ता.५) विरोधी गटाच्या नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने नगराध्यक्षा व मुख्याधिकारी यांची भेट घेतली. दोषींवर गुन्हा नोंदविण्याची मागणी नगरसेवकांनी लावून धरली. त्यानुसार पालिका येत्या तीन दिवसांत कायदेशीर कारवाई करेल असे आश्वासन नगराध्यक्षांनी दिले.

दरम्यान, मोडतोड झालेले स्वच्छतागृह पुन्हा बांधून व लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी पोर्टेबल स्वच्छतागृहाची व्यवस्था केली जाईल, असे आश्वासन पालिकेने दिले आहे.

या शिष्टमंडळात नगरसेवक अ‍ॅड. शंशाक नार्वेकर, सुधीर कांदोळकर, अन्वी कोरगांवकर, आनंद भाईडकर, माजी नगरसेवक तुषार टोपले व इतरांचा समावेश होता.

अन्वी कोरगांवकर म्हणाल्या की, आपल्या प्रभागातील स्वच्छतागृह काही अनोळखी व्यक्तींनी पाडण्याचा प्रयत्न केला. हे स्वच्छतागृह जीर्ण झाले असले तरी याचा वापर प्रभागातील लोकांकडून विशेषतः महिलावर्गाकडून व्हायचा. अशाप्रकारे पालिकेच्या मालकीचे बांधकाम मोडण्याचा प्रकार निषेधार्थ असून दोषींवर कडक कारवाईची मागणी त्यांनी केली.

अ‍ॅड. शंशाक नार्वेकर म्हणाले की, मागील दोन महिन्यांत शहरात अनधिकृतपणे पालिकेचे दोन स्वच्छतागृह पाडण्याचा प्रयत्न झाला. अन्साभाट-विठ्ठलवाडी येथील स्वच्छतागृह तर जमीनदोस्तच करण्यात आले. याप्रकरणात पालिकेने कुठलीही कारवाई केली नाही.

आता खोर्लीमधील स्वच्छतागृह पाडण्याचा प्रयत्न झाला. पालिकेने पहिल्या प्रकरणात कारवाई केली असती, तर अशाप्रकारे कायदा हातात घेण्याचे धारिष्ट कुणी केले नसते. पालिकेने स्वेच्छा दखल घेत पोलिस तक्रार करावी.

फाईल गायबप्रकरणी पोलिस तक्रार करावी

पालिका जरी म्हणत असली की, स्वच्छतागृह विषयी कागदपत्रे पालिकेजवळ नाहीत, तर पालिकेने वीज व पाणी बिलांच्या आधारांवर स्वच्छतागृहासंबंधी नवीन फाइलची पुनर्रचना करावी. पालिकेतून दस्तऐवज गायब होत असल्याचा हा गंभीर विषय असून याबाबत पोलिस तक्रार करावी, असे नार्वेकर म्हणाले.

खोर्लीमधील स्वच्छतागृह पाडण्याचा प्रयत्न झाला असून त्याविषयी चौकशी करून येत्या तीन दिवसांत कायदेशीर कारवाई केली जाईल. सर्व दस्तऐवज तपासून प्रक्रिया करणार आहोत.
डॉ. नूतन बिचोलकर, नगराध्यक्षा

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT