Goa Bicholim Ganesh Chaturthi Dainik Gomantak
गोवा

Ganesh Chaturthi 2024: डिचोली-मयेत गणेशमूर्ती बनवण्याची लगबग सुरु; मूर्तिकार कामात मग्न

Bicholim Mayem: डिचोली तालुक्यात शंभरहून अधिक चित्रशाळा असून मये गावात सर्वाधिक चित्रशाळा आहेत

गोमन्तक डिजिटल टीम

तमाम गणेशभक्तांना आता हळूहळू गणेश चतुर्थीचे वेध लागले असून, सध्या डिचोलीतील विविध भागातील चित्रशाळांमधून गणपतीच्या मूर्ती घडविण्याची लगबग सुरु झाली आहे. डिचोली तालुक्यात शंभरहून अधिक चित्रशाळा असून, मये गावात सर्वाधिक चित्रशाळा आहेत. चतुर्थीला साधारण दोन महिने राहिल्याने डिचोलीत विविध भागांतील मूर्तीकारांनी चिकण माती उपलब्ध केली आहे.

आता मूर्तिकारांचे हात कामाला लागले असून, गणपतीच्या मूर्तीही आकार घेऊ लागल्या आहेत. डिचोलीसह, मये, कारापूर आदी भागातील चित्रशाळांमधून सध्या गणपती बनविण्याचे काम सुरु झाले आहे. पुढील महिन्यापासून कामाला जोर येण्याचे संकेत आहेत.

डिचोलीतील काही चित्रशाळांमधून राज्याबाहेरील कुशल कारागिरांची मदत घेण्यात येते. यंदा काही चित्रशाळांनी हे कारागीर उपलब्ध झाले आहेत. मूर्तिकारांनी वेगवेगळ्या भागातून चिकण माती उपलब्ध केली असून, मूर्तिकारांचे हात कामाला लागले आहेत. विविध चित्रशाळांमधून गणपतीच्या मूर्त्या आकारही घेऊ लागल्या आहेत.

चिकण माती चित्रशाळेत आणीपर्यंत आलेला खर्च आणि वाढत्या महागाईमुळे यंदा गणपतीच्या मूर्तीचे दर किंचित वाढण्याचे संकेत आहेत. तरीदेखील राज्यात प्लास्टर ऑफ पॅरीसच्या मूर्तीचे आक्रमण ही मूर्तीकारांसाठी चिंतेची बाब बनली आहे. गणेश चतुर्थी यंदा सप्टेंबर महिन्याच्या 7 तारखेला साजरी होणार आहे.

प्लास्टर ऑफ पॅरिसला विरोध

बंदी असतानाही आणि स्थानिक मूर्तीकारांचा विरोध असतानाही गेल्या काही वर्षांपासून प्लास्टर ऑफ पॅरीसच्या मूर्तीनी राज्यात आक्रमण केले आहे. शाडू मातीच्या मूर्ती असल्याचे सांगून प्लास्टर ऑफ पॅरीसच्या मूर्तीची विक्री होत असते. या मूर्ती दिसायला सुबक आणि वजनाने हलक्या असल्याने काही गणेशभक्त या मूर्तीना पसंती देतात. प्लास्टर ऑफ पॅरीसच्या मूर्तीमुळे स्थानिक मूर्तीकारांच्या व्यवसायाला फटका बसत आहे. असे विलास कुंकळकर, रमाकांत शेटकर (डिचोली), सज्जन गावकर (कारापूर) आदी मूर्तिकारांचे म्हणणे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT