Mayem Van Accident Dainik Gomantak
गोवा

Goa Accident News: मये येथे व्हॅनची झाडाला धडक; चालकाची प्रकृती चिंताजनक

अर्धवाडा-मये परिसरात शुक्रवारी रात्री अपघात झाला

गोमन्तक डिजिटल टीम

Mayem Van Accident: मये येथे रस्त्याच्या बाजूला असलेल्या फणसाच्या झाडाला व्हॅनची धडक बसून चालक गंभीर जखमी झाला. तर व्हॅनची पूर्णतः मोडतोड झाली. या अपघातात गंभीर जखमी झालेला युवक पैरा येथील असून, त्याचे नाव गणेश घाटवळ असे असल्याची माहिती मिळाली.

त्याच्यावर सध्या बांबोळी येथील गोमेकॉत उपचार चालू आहेत. त्याची प्रकृत्ती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे.

मये-पैरा रस्त्यावरील अर्धवाडा-मये परिसरात शुक्रवारी (ता.२५) रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडल्याची माहिती स्थानिकांकडून मिळाली आहे. चालकाचे नियंत्रण गेल्याने हा अपघात घडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

यासंबंधीची उपलब्ध माहिती अशी, की जीए-०४-ई-३६७१ या क्रमांकाची व्हॅन पैराच्या दिशेने जाताना अर्धवाडा-मये येथे रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या फणसाच्या झाडाला व्हॅनची धडक बसली.

धडक एवढी जबरदस्त होती, की आवाजाबरोबर शेजारील घरांतील लोक जागे झाले. त्यांनी बाहेर धाव घेऊन गाडीत अडकलेल्या चालकाला बऱ्याच प्रयत्नाअंती बाहेर काढून लागलीच उपचारार्थ इस्पितळात नेण्यात आले.

अपघात घडला, त्यावेळी चालक सोडल्यास व्हॅनमध्ये कोणीच नव्हते, अशी माहिती मिळाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pilots Dope Test: वैमानिकांची आता वर्षातून एकदा होणार 'डोप टेस्ट'! DGCA लागू करणार नवा नियम; जाणून घ्या काय आहे नवा प्लॅन?

Headland Sada: पोस्ट खात्याची सदनिका बनली शेळ्यांचा निवारा! वर्षानुवर्षे दुर्लक्षामुळे सरकारी इमारत जीर्ण; भंगारवाल्याचाही शिरकाव

Lucky Zodiac Signs 2026: बुधाचे मघा नक्षत्रात गोचर! 'या' लकी राशींवर होणार पैशांचा पाऊस, रक्षाबंधनापर्यंत जॅकपॉट

Colvale Electricity Bills: कोलवाळात वीज बिले दुप्पट-तिप्पट! ग्राहकांना 17 हजारांपर्यंत बिलांचा फटका, फेरपडताळणीची मागणी

Tarun Tejpal Case: तरुण तेजपालला सुप्रीम कोर्टाचा दणका! अधिक वेळ देण्याची याचिका फेटाळली; दोन आठवड्यांत आत्मसमर्पणाचे निर्देश

SCROLL FOR NEXT