Mayem Lake Road Reopened Traffic Dainik Gomantak
गोवा

मये तलावाजवळील रस्ता अखेर खुला, अवजड वाहनांना तूर्त बंदी; आमदार प्रेमेंद्र शेट यांनी केली पाहणी

Mayem Lake Road Reopened Traffic: गेल्या जवळपास पंधरा दिवसांपासून वाहतुकीसाठी बंद असलेला मये तलावाकडील रस्ता अखेर शुक्रवारपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.

गोमंतक ऑनलाईन टीम

डिचोली: गेल्या जवळपास पंधरा दिवसांपासून वाहतुकीसाठी बंद असलेला मये तलावाकडील रस्ता अखेर शुक्रवारपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.

हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला असला, तरी सध्या केवळ दुचाकी आणि चारचाकी वाहनांना या रस्त्यावरून ये-जा करता येणार आहे, तर अवजड वाहनांना वाहतुकीसाठी हा रस्ता तूर्त बंदी आहे.

जागतिक पर्यटन स्थळ असलेल्या मये तलावाकडील रस्त्याखालील बांधाच्या दुरुस्तीकामानिमित्त गेल्या ७ मे रोजीपासून मये तलावाकडील श्री तळेश्वर मंदिरासमोरून जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. सुरक्षिततेच्या दृष्टीने तसा आदेशही उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला होता.

मये तलावावरील रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याने नार्वे तसेच चोडणहून कावळे रानमार्गे डिचोली आणि डिचोलीहून नार्वे आणि चोडणच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना गेले पंधरा दिवस पर्यायी मार्गाने वाहतूक करावी लागत होती. त्यामुळे वाहनचालकांची काहीसी गैरसोय झाली होती.

दरम्यान, हा रस्ता लवकरात लवकर वाहतुकीसाठी खुला करण्यात यावा, अशी मागणी स्थानिकांसह इतर नागरिकांनी केली होती.

‘वाहनचालकांनी काळजी घ्यावी’

मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांनी आज मये तलावावरील बांधाच्या कामाची पाहणी करून कामाबाबत समाधान व्यक्त केले. या बांधाचे बहुतांश काम पूर्ण झाले असून जनतेची गैरसोय लक्षात घेवून बंद असलेला मये तलावाकडील रस्ता आता दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी खुला करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

सध्या या बांधाचे काम अंतिम टप्प्यात आहे. तूर्त रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला असला, तरी वाहनचालकांनी सहकार्य करावे. वाहने हाकताना वाहनचालकांनी काळजी घ्यावी. वाहने सावकाश हाकावी, असे आवाहन आमदार शेट यांनी केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT