Vedanta Flyover Dainik Gomantak
गोवा

Vedanta Flyover: वेदान्ताच्या फ्लायओव्हरला मये ग्रामसभेचा विरोध! ठराव संमत; एनओसी मागे घेण्याची मागणी

Maye Gram Sabha Resolution: मये जंक्शनवरील वेदान्‍ता कंपनीच्या प्रस्तावित ‘फ्लायओव्हर’चा मुद्दा मये-वायंगिणी पंचायतीच्या ग्रामसभेत चांगलाच तापला.

गोमंतक ऑनलाईन टीम

डिचोली: मये जंक्शनवरील वेदान्‍ता कंपनीच्या प्रस्तावित ‘फ्लायओव्हर’चा मुद्दा मये-वायंगिणी पंचायतीच्या ग्रामसभेत चांगलाच तापला. या प्रस्तावाला विरोध दर्शवत ग्रामस्थांनी ठराव संमत केला. पंचायतीने या प्रकल्पासाठी ना-हरकत दाखला (एनओसी) दिला असल्यास तो मागे घ्यावा, अशी मागणीही ग्रामस्थांनी केली.

स्थानिक शेतकरी, ट्रकचालक आणि खाण कामगारांचे प्रलंबित प्रश्न सुटेपर्यंत खाण कंपन्यांना कोणत्याही कामासाठी एनओसी देऊ नये, अशी भूमिका ग्रामस्थांनी मांडली. ग्रामस्थांच्या विरोधानंतर एनओसीबाबत फेरविचार करण्याची ग्वाही पंचायतीने दिली.

सरपंच विनिता पोळे यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी पंचायत सभागृहात ग्रामसभा झाली. पंचायत सचिव महादेव नाईक यांनी मागील ग्रामसभेचे इतिवृत्त सादर केले. निरीक्षक म्हणून विशाल गाड उपस्थित होते. उपसरपंच वर्षा गडेकर यांच्यासह सर्व ११ पंचसदस्य आणि शंभरहून अधिक ग्रामस्थ ग्रामसभेला उपस्थित होते. ग्रामसभेच्या सुरुवातीलाच खाण व्यवसायाशी संबंधित प्रश्न उपस्थित करण्यात आले. मये पंचायत क्षेत्रातील वेदान्‍ता (सेझा) आणि साळगावकर खाण कंपन्या स्थानिकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.

माजी सरपंच सुभाष किनळकर, सखाराम पेडणेकर, नागेश नाईक आणि संतोषकुमार सावंत यांनी खाण व्यवसायामुळे निर्माण होणाऱ्या समस्या मांडल्या. स्थानिकांना डावलून खाण कंपन्यांना एनओसी दिल्यास तीव्र विरोध केला जाईल, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला. सखाराम पेडणेकर यांनी खाण कंपन्यांकडून किती महसूल जमा झाला, असा प्रश्न उपस्थित केला.

दरम्यान, पैरा येथे एका परप्रांतीय व्यक्तीकडून बेकायदा बांधकाम केले जात असून, संबंधित व्यक्ती दमदाटी करीत असल्याची तक्रार एका ज्येष्ठ स्थानिक महिलेने केली. या प्रकरणी येत्या बुधवारी, २८ ऑक्टोबर रोजी जागेची पाहणी करण्याचे आश्वासन पंचायतीने दिले.

सिकेरी गोशाळेत शेणापासून गॅसनिर्मितीचा प्रस्ताव

मये-वायंगिणी पंचायतीच्या ग्रामसभेत सिकेरी येथील गोशाळेचा विषय पुन्हा चर्चेला आला. गोशाळेचे संचालक कमलाकांत तारी यांनी ग्रामस्थांच्या प्रश्नांना उत्तरे देताना गोशाळेतील शेणापासून गॅसनिर्मिती प्रकल्प सुरू करण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती दिली.

स्थानिकांचे प्रश्न आधी सोडवा

मये पंचायत क्षेत्रातील शेतकरी, ट्रकचालक आणि खाण कामगारांचे प्रश्न प्रलंबित असल्याने खाण कंपन्यांना नव्या कामांसाठी एनओसी देऊ नये, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. मये जंक्शनवरील वेदान्‍ताच्या प्रस्तावित ‘फ्लायओव्हर’ला विरोध दर्शविणारा ठरावही ग्रामसभेत घेण्यात आला. पंचायतीने यापूर्वी एनओसी दिली असल्यास ती मागे घेण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. त्यावर एनओसीबाबत फेरविचार करण्याची ग्वाही पंचायतीने दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Driving Licence New Rules: ड्रायव्हिंग लायसन्सच्या नियमांत मोठे बदल! भारतीय आणि विदेशी नागरिकांसाठी वेगवेगळ्या रंगांचे DL, नाव-पत्ता बदलण्याची सुविधा मोफत

Horoscope: आठवड्याची सुरुवात ठरणार धमाकेदार! सोमवारच्या दिवशी 'या' 4 राशींचे नशीब चमकणार, नोकरीत यश मिळणार

Chhatrapati Shivaji Maharaj: शिवरायांची तंजावरपर्यंत धडक! दक्षिण दिग्विजयातून मराठा साम्राज्याचा विस्तार

'RGP'तील वाद चिघळला! वीरेश बोरकर पक्षाचे नाव, चिन्ह बेकायदेशीररीत्या वापरत असल्याचा आरोप; कायदेशीर कारवाईची तयारी

FC Goa: एफसी गोव्याचा झुंजार खेळ, पण आव्हान संपले! अल कादसाकडून 1-2 ने पराभव

SCROLL FOR NEXT