Theft Canva
गोवा

Mayade Theft: मयडेत पावणेतीन लाखांचा ऐवज लंपास! ग्रामस्थांनी संशयावरून तीन महिलांना दिले पोलिसांच्या ताब्यात

Goa Crime News: मयडे येथे दोन घरे फोडून अनोळखी चोरट्यांनी नळाचे टॅप व इतर वस्तू मिळून पावणेतीन लाखांचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी संशयावरून म्हापसा पोलिसांनी गदग येथील तीन महिलांना अटक केली.

गोमन्तक डिजिटल टीम

म्हापसा: मयडे येथे दोन घरे फोडून अनोळखी चोरट्यांनी नळाचे टॅप व इतर वस्तू मिळून पावणेतीन लाखांचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी संशयावरून म्हापसा पोलिसांनी गदग येथील तीन महिलांना अटक केली.

अटक केलेल्या संशयित महिलांमध्ये सरोजा अशोक पवार (रा. गिरी), सुभव्वा ईश्वर लमाणी (रा.गिरी) व रेणूका सदानंद चिक्रे (रा. माडेल थिवी) यांचा समावेश आहे. त्या भंगार गोळा करण्याचे काम करतात.

रविवारी ६ रोजी सकाळी भंगार गोळा करण्यासाठी फिरणाऱ्या या महिलांचा गावात होणाऱ्या चोऱ्यांमध्ये हात असल्याच्या संशयावरून लोकांनी संशयित महिलांना पकडले व नंतर त्यांना पोलिसांच्या स्वाधीन केले.

या दोन्ही चोरीच्या घटना १ ते ४ ऑक्टोबर दरम्यान घडलेल्या. पिराझोना मयडे येथे रॉडनी रॉड्रिग्ज यांच्या घराचा मागचा लाकडी दरवाजा तोडून आत शिरकाव केला. घरातील सर्व नळाचे टॅप, सोन्याचा मास्कोट, कॅमेरा व लॅपटॉप अशा सुमारे २ लाखांच्या वस्तू चोरल्या.

घराचे मालक हे परदेशात असतात. घराचे काळजीवाहू लवू कुबल यांनी या प्रकरणी पोलिसांत तक्रार दिली. मंगळवार १ रोजी ते घर बंद करून गेले होते. तर शनिवारी ५ रोजी ते सकाळी घरी परतले. तेव्हा हा चोरीचा प्रकार निदर्शनास आला.

बांबुर्डेत चोरी

बांबुर्डे-मयडे येथील शांती भर्तू यांचे बांधकाम सुरू असलेले घर अज्ञात चोरट्यांनी फोडले व आतील ७० हजारांचे नळाचे टॅप चोरून नेले. भर्तू यांच्या या घराचे बांधकाम पूर्णत्वाकडे आहे. त्यांच्या घरातील सर्व नळांचे फक्त टॅप चोरांनी चोरून नेले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT