Mauvin Godinho News Dainik Gomantak
गोवा

टॅक्सीमालकांची दादागिरी बंद करणार; गुदिन्हो यांचा इशारा

कारवाई अटळ: कापड टाकून मीटर लपवण्याचा प्रकार उघडकीस

दैनिक गोमन्तक

पणजी : राज्यातील टॅक्सींमध्ये सरकारकडून विनामूल्य डिजिटल मीटर बसवले असले, तरी त्याचा वापर केला जात नाही. यासंदर्भात उच्च न्यायालयाने आदेशदेखील दिला आहे, तरीही कापड टाकून मीटर लपवण्याचे काम टॅक्सीचालक करत आहेत. त्यामुळे आता कारवाई करण्याची वेळ आली असून, कोणत्याही दबावाखाली येऊन माघार घेणार नाही. टॅक्सीमालकांची दादागिरी बंद करू, असा इशारा वाहतूकमंत्री मॉविन गुदिन्हो यांनी दिला.

पर्वरी येथे विधानसभा संकुलाबाहेर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी गुदिन्हो म्हणाले, माझ्या दाबोळी मतदारसंघात विमानतळ असून तेथे काय चाललंय हे मला ठाऊक आहे. राज्यात येणाऱ्या पर्यटकांना चांगली सार्वजनिक वाहतूक सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. सध्या दक्षिण किंवा उत्तर गोव्यातील किनारपट्टी भागातील हॉटेलमध्ये टॅक्सी घेऊन गेल्यास हे लोक दादागिरी करतात. दादागिरी करून त्यांना मनमानी करत येईल असे त्‍यांना वाटत असेल, तर हा त्यांचा गैरसमज आहे. दादागिरी खपून घेणार नाही. संबंधितांवर योग्य कारवाई करण्यात येईल, असे गुदिन्हो यांनी ठणकावून सांगितले.

राज्यात ॲप आधारित टॅक्सी सेवा आणण्यास टॅक्सी संघटनेचा विरोध आहे. परंतु, बसवलेले मीटर वापरण्याऐवजी ते कारणे सांगत आहेत. पर्यटकांच्या अजूनही तक्रारी येत असून त्यांना उत्कृष्ट सार्वजनिक वाहतूक व्यवस्था देणे ही माझी जबाबदारी आहे, असंही मॉविन गुदिन्हो पुढे म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT