Tembwada Morjim Beach Dainik Gomantak
गोवा

Morjim Beach: मोरजी किनाऱयावर कचराच कचरा! अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष; पर्यटन व्यवसायावर परिणाम होण्याची शक्यता

Tembwada Morjim Beach: तेंबवाडा येथील समुद्रकिनारी सध्या मोठ्या प्रमाणात कचरा दाटला आहे. हा कचरा पाहून येथे येणारे देश विदेशी पर्यटक नाक मुरडत आहेत. हा कचरा हटवावा अशी मागणी होत आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Tembwada Morjim Beach Garbage Problem

मोरजी: तेंबवाडा येथील समुद्रकिनारी सध्या मोठ्या प्रमाणात कचरा दाटला आहे. हा कचरा पाहून येथे येणारे देश विदेशी पर्यटक नाक मुरडत आहेत. हा कचरा हटवावा अशी मागणी होत आहे.

येथील जागृत नागरिक अल्बर्ट फर्नांडिस यांनी सांगितले की, या किनाऱ्यावर सध्या गाळ वजा कचरा मोठ्या प्रमाणात दाटलेला आहे. या कचऱ्यामुळे किनाऱ्यावर चालत जाणेही कठीण होते. पर्यटन खातेने या किनाऱ्याकडे दुर्लक्ष केले आहे. सरकारने हा कचरा लवकर उचलावा.

फर्नांडिस यांनी पुढे सांगितले की, सरकार राज्यात पर्यटन वाढावे यासाठी दरवर्षी करोडो रुपये खर्च करते. परंतु पर्यटन स्थळांची निघा राखण्यास सरकार कमी पडते. किनाऱ्यावरील कचरा उचलण्यासाठी लाखो रुपये देऊन कंत्राटदार नेमले जातात. मात्र हे कंत्राटदार वेळेवर कचरा उचलला जातो की नाही, याची पडताळणी केली जात नाही. अधिकारी याकडे दुर्लक्ष करतात, त्यामुळे किनाऱ्यावर नेहमी कचरा पडून असल्याचे चित्र दिसते.

किनाऱ्याची निगा राखण्यास अपयश

तेंबवाडा किनारा हा पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो. कासव संवर्धन मोहीमही या किनाऱ्यावर राबवली जाते. त्यामुळे या किनाऱ्याला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. या किनाऱ्याच्या एका बाजूला मोठ्या प्रमाणात शॅक व अन्य व्यवसाय आहेत. पर्यटन मोसमात पर्यटन खाते शॅक, रेस्टॉरंट उभारण्यास परवाने देते. त्यातून अनेक बेरोजगारांना रोजगार मिळतो. तसेच सरकारलाही मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो. मात्र या किनाऱ्याची निगा राखण्यास सरकार कमी पडते, असे येथील व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

सर्वत्र कचरा वजा गाळ

राज्यात पर्यटन हंगाम सुरू झाला आहे. तेमवाडा किनारी भागात फेरफटका मारला तर सर्वत्र कचरा वजा गाळ दिसून येतो. येथे अनेक देशी विदेशी पर्यटक भेटी देतात. अनेकजण फोटो, व्हिडिओ काढून व्हायरल करतात, त्यामुळे येथील पर्यटन व्यवसायवर याचा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे येथील व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT