Goa Fire Dainik Gomantak
गोवा

Goa Fire: काझा मॉडर्नाला भीषण आग

लाखोंचे साहित्य खाक : सुदैवाने जीवितहानी टळली

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Fire पणजी येथील सिने नॅशनलजवळ असलेल्या दुमजली काझा मॉडर्ना फॅमिली रेस्टॉरंट व बारला बुधवारी पहाटे साडेसहाच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत संपूर्ण साहित्य खाक झाले.

सुदैवाने जीवितहानी टळली. तसेच या रेस्टॉरंट्सच्या बाजूच्या दुकानांचे कोणतेही नुकसान झाले नाही.

सुमारे दोन तासांच्या खडतर प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाच्या जवांनी ही आग आटोक्यात आणली. त्यासाठी त्यांनी तीन पाण्याच्या बंबचा वापर केला.

या आगीमागील कारण वीज खाते आणि पोलिसांच्या अहवालानंतरच स्पष्ट होईल. प्रथमदर्शनी ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, काझा मॉडर्ना रेस्टॉरंटमधून धूर येत असल्याचा फोन भोसले नावाच्या व्यक्तीने अग्निशमन दल नियंत्रण कक्षाला केला. दलाचे जवान घटनास्थळी पोहचले, तेव्हा आतून धूर येत होता, तसेच आगीच्या तीव्रतेचा अंदाज येत नव्हता.

रेस्टॉरंट्सचे शटर बंद असल्याने ते तोडण्यात आले; परंतु आगीने रौद्र रूप धारण केले होते. त्यामुळे आतमध्ये प्रवेश करणे शक्य नव्हते. पाण्याचा मारा करतच जवानांनी आत प्रवेश केला. तोपर्यंत आतील लाकडी साहित्य तसेच टीव्ही, रेफ्रिजरेटर, संगणक तसेच इतर साहित्य खाक झाले होते.

लाकडी खुर्च्या तसेच सोफा सेट भस्मसात झाले. ही आग रेस्टॉरंट्सच्या दुसऱ्या मजल्यापर्यंत पोहचून सर्व वस्तू तसेच साहित्याचे नुकसान झाले.

आग पहाटेच्या सुमारास लागून आतील साहित्य खाक होऊन बाहेर धूर आल्यानंतरच त्याचा उलगडा झाला, असे मत दलाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केले. आजूबाजूच्या दुकानांपर्यंत ही आग पोहचण्यापूर्वीच ती आटोक्यात आणल्याने मोठी दुर्घटना टळली.

स्वयंपाक गृहामधील यंत्रेही भस्मसात

यासंदर्भात रेस्टॉरंट्सचे व्यवस्थापक लक्ष्मण महातो म्हणाले की, ही आग पहाटे लागली. त्यावेळी रेस्टॉरंटचे शटर बंद होते. या रेस्टॉरंट्सचे मालक ए. शेट्टी हे सध्या गोव्याबाहेर असून या घटनेची माहिती त्यांना देण्यात आली आहे.

ते गोव्यात येण्यास निघाले आहेत. या आगीत रेस्टॉरंटमधील बहुतेक सर्व साहित्य खाक झाले आहे. रेफ्रिजरेटर, डीप फ्रीज, संगणक, टीव्ही तसेच स्वयंपाक गृहामधील अनेक वस्तूंचे नुकसान झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ऑर्डर उशिरा का आणली?' म्हणत डिलिव्हरी बॉयला फ्लॅटमध्ये खेचून मारहाण, तीन मिनिटांचा CCTV व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! पगार किती वाढणार? फिटमेंट फॅक्टर किती असेल? 5 महत्त्वाचे अपडेट्स आले समोर

Rishabh Pant Record: गिलख्रिस्टचा वर्ल्ड रेकॉर्ड उद्ध्वस्त! ऋषभ पंत बनला 'सिक्सर किंग', परदेशात 'अशी' कामगिरी करणारा ठरला पहिलाच खेळाडू

Investment Fraud: भरघोस परताव्याचं स्वप्न दाखवलं अन् 85.5 लाखांवर डल्ला! शिवोलीतील महिलेची फसवणूक, मुंबईतील दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल

AUS vs BAN: क्रिकेटविश्वात मोठा उलटफेर! बांगलादेशनं बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 9 विकेट्सनं लोळवलं, 30 मिनिटांत कांगारूंचा खेळ खल्लास Watch Video

SCROLL FOR NEXT