Cash For Job Scam Canva
गोवा

एकाच दिवशी Cash For Job मधील ठकसेनांना जामीन! तक्रारदारांची मात्र चिंता संपेना

Goa Job Fraud: राज्यातील तरुणाईला सरकारी नोकरीचे आमिष दाखवून लाखो-कोट्यवधी रुपयांना चुना लावलेल्या ठकसेनांना आज एकाच दिवशी घाऊकरित्या जामीन मिळाल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Cash For Job Scam Accused Bails

पणजी: राज्यातील तरुणाईला सरकारी नोकरीचे आमिष दाखवून लाखो-कोट्यवधी रुपयांना चुना लावलेल्या ठकसेनांना आज एकाच दिवशी घाऊकरित्या जामीन मिळाल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. सरकारी नोकरीचे आमिष दाखवून अनेकांना कोट्यवधींचा गंडा घातलेल्या जुने गोवे येथील संशयित पूजा नाईक हिला तिच्याविरुद्ध विविध पोलिस स्थानकांत दाखल झालेल्या गुन्ह्यांमधून जामीन मिळाला आहे.

ढवळी येथील योगेश शेणवी कुंकळ्येकर आणि पर्वरी येथील श्रुती प्रभुगावकर या दोघांनाही सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे. मडगावात विषया गावडे आणि सोनिया आचारी यांचीही न्यायालयाने जामिनावर मुक्तता केली आहे.

डिचोलीत अनेकांना सरकारी नोकरीचे आमिष दाखवून गंडा घातलेल्या प्रिया यादव हिच्याविरोधात फसवणुकीचे तीन गुन्हे नोंद आहेत. सध्या ती न्यायालयीन कोठडीत आहे. पोलिस या प्रकरणांचा तपास करत असले, तरी आपले पैसे कधी आणि कसे मिळणार, याची चिंता या प्रकरणातील पीडितांना लागली आहे. ‘सरकारी नोकरी नाही ते नाहीच, शिवाय पैसेही गेले’, अशी त्यांची कोंडी झाली आहे.

योगेश, श्रुतीचे बँक डिटेल्स तपासले

फोंड्यातील बहुचर्चित कॅश फॉर जॉब प्रकरणातील ढवळी येथील योगेश शेणवी कुंकळ्येकर व पर्वरी येथील श्रुती प्रभुगावकर या दोघांनाही सशर्त जामीन मंजूर करण्यात आला. या दोघांनाही फोंडा पोलिसांनी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर उभे केले असता त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. फोंडा पोलिसांनी या प्रकरणी तपास करताना दोघांचेही बँक डिटेल्स तपासले आहेत, शिवाय दोघांकडून प्रत्येकी एक वाहन जप्त केले आहे. फोंडा पोलिस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

महिन्यानंतर पूजा कोठडीबाहेर

पूजा नाईकविरुद्ध म्हार्दोळ, डिचोली, पर्वरी व पणजी पोलिसांत ६ तक्रारी दाखल झाल्या होत्या. तिला एक महिन्यापूर्वी म्हार्दोळ पोलिसांनी सरकारी नोकरी घोटाळाप्रकरणी पहिल्यांदा अटक केली होती. पैसे देऊनही सरकारी नोकरी न मिळालेल्यांनी पोलिस स्थानकात तक्रारी नोंदविण्याचा सपाटाच लावला होता. पणजी पोलिसांच्या गुन्ह्यात तिला जामीन मिळाल्यानंतर ती इतर कोणत्याही गुन्ह्यात नको असल्यास तिची जामिनावर मुक्तता करावी, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT