CM Pramod Sawant  Dainik Gomantak
गोवा

Pramod Sawant: हुतात्मा स्मारकाचे लवकरच लोकार्पण! मुख्यमंत्र्यांची घोषणा

Independence Day 2024: मुख्यमंत्र्यांनी ध्वजारोहणानंतर स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून स्वातंत्र्यवीरांना आदरांजली वाहिली

गोमन्तक डिजिटल टीम

पेडणे: शेती जमीन रूपांतरावर लवकरच कायद्याने निर्बंध आणणार, तसेच नूतनीकरण केलेल्या पत्रादेवी हुतात्मा स्मारकाचे १९ डिसेंबरपूर्वी लोकार्पण करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रादेवी येथे केली. मुख्यमंत्र्यांनी ध्वजारोहणानंतर स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून स्वातंत्र्यवीरांना आदरांजली वाहिली.

केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाचे राज्यमंत्री श्रीपाद नाईक, आमदार प्रवीण आर्लेकर, आमदार जीत आरोलकर, स्वातंत्र्यसैनिक संघटनेचे अध्यक्ष रोहिदास नाईक देसाई, जि. प. सदस्य रंगनाथ कलशावकर, सतीश शेटगावकर, मनोहर धारगळकर, नगराध्यक्ष शिवराम तुकोजी, सरपंच स्वाती तोरस्कर, जिल्हाधिकारी डॉ. स्नेहा गीते, उपजिल्हाधिकारी शिवप्रसाद नाईक, पोलिस उपअधीक्षक जिवबा दळवी आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, सरकारने गोवा मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक हिरवे गुरुजी व शेषनाथ वाडेकर यांची स्मारके बांधिली. १९५५ मध्ये गोवा मुक्ती संग्रामात कर्नलसिंग बेनिपाल यांनी केलेल्या अंतिम बलिदानाचा आदर करण्यासाठी आणि स्मरण ठेवण्यासाठी त्यांच्या घरी भेट देऊन त्यांच्या पत्नीचा सत्कार केला.

मोदी यांनी नावीन्य, हरित ऊर्जा आणि स्टार्टअपवर सारख्या अनेक गोष्टीवर लक्ष केंद्रित करून विविधमार्ग दाखविले आहेत. पुढील पाच वर्षांत केंद्र सरकार आगामी पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांसाठी अतिरिक्त ३० हजार कोटींची तरतूद करणार असून सर्व तरुणांनी या संधीचा लाभ घ्यावा असे ते म्हणाले.

पोलिस-पत्रकार वाद

स्वांतत्र्यदिनाच्या कार्यक्रमप्रसंगी पेडणेतील पत्रकार एका बाजूला उभे राहून चित्रीकरण व वार्तांकन करत होते. त्यावेळी पोलिसाने कार्यक्रम इतरांना दिसत नाही, तेव्हा तुम्ही बाजूला व्हा, सुनावले. यावेळी पोलिस- पत्रकारात वाद झाला आणि पत्रकार निघाले. प्रत्येक कार्यक्रमात पत्रकारांसाठी खास खुर्च्या राखीव ठेवाव्यात, असा आदेश मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT