Goa Police Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News : विवाहितेवर बलात्कार करणाऱ्या फरार नातेवाईकाला अखेर अटक; मायणा - कुडतरी येथील घटना

पोलिसांनी पश्चिम बंगाल हावडा येथे जाऊन संशयिताला अटक केली.

गोमन्तक डिजिटल टीम

मायणा कुडतरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका 27 वर्षीय विवाहितेवर बलात्कार झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणातील संशयित फरार होता. फरार संशयिताला अटक करण्यात गोवा पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी पश्चिम बंगाल हावडा येथे जाऊन संशयिताला अटक केली.

संशयित नाबाकुमार सरदार (26) याला सोमवारी घेउन पोलिस गोव्यात पोहचले. संशयित पिडित महिलेच्या पतीचा नातेवाईक आहे. त्याच्या विरुध्द भादंसंच्या ३६६, ३७६ व ५०६ कलमाखाली पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.

अधिक तपासासाठी या संशयिताला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. मायणा कुडतरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अरुण देसाई यांच्या उपनिरीक्षक वर्षदा नाईक देसाई पुढील तपास करीत आहेत.

9 जून ते 20 जून 2023 पर्यंत संशयिताने पिडितेवर लैंगिक अत्याचार केले होते. या प्रकरणी झाल्या प्रकाराची कुठे वाच्यता केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागेल अशी धमकीही त्याने दिली होती.

पिडित महिला मायणा कुडतरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका ठिकाणी भाडयाच्या घरात रहात होती. तिथे संशयिताने तिच्यावर बलात्कार केला होता. हा संशयित सध्या पोलीस कोठडीत असून या प्रकरणी पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे .

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Bike Stunt Video: काळजाचं पाणी करणारा थरारक स्टंट! पठ्ठ्याचा डोकं चक्रावणारा व्हिडिओ व्हायरल; जीवाची लावली बाजी

Shani Gochar 2026: शनिदेव देणार 5 राशींना श्रीमंतीचं वरदान! हाती लागणार कुबेराचा खजिना; करिअरला मिळणार नवा बूस्ट

Colvale Jail Employee Stress: अभद्र युतीमुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा गुदमरतोय जीव! सुधारगृह गुन्हेगारांचा अड्डा; मानसिक आरोग्य कक्ष व छळविरोधी समित्यांची तातडीची मागणी

Crime News: आधी विषारी कोल्ड्रिंक पाजले, मग गळा आवळून केला खून! 20 वर्षांच्या संसारानंतर बायकोनेच नवऱ्याचा काढला काटा; कारण ऐकून व्हाल अवाक

Jitesh Kamat Colvale Jai: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाची सद्यस्थिती पाहता, 'गुन्हेगारांना आलिशान सुविधा पुरवणारे हॉलिडे होम' - जितेश कामत

SCROLL FOR NEXT