Master Plan Dainik Gomantak
गोवा

Goa News: बिल्डरांसाठीच ‘मास्टर प्लॅन’

Goa News: कारस्‍थानाचा मडगावात संशय: म्युझियम, कृषी हबला वाव

दैनिक गोमन्तक

Goa News: सध्‍या विरोधी पक्षासह सामाजिक कार्यकर्त्यांकडून मडगावच्‍या 2041 च्‍या ‘मास्‍टर प्‍लॅन’ला विरोध होत असला, तरी कागदावर हा आराखडा अगदी उत्‍कृष्‍ट दिसत आहे. मात्र, हा आराखडा म्‍हणजे बिल्‍डर लॉबीला संपूर्ण शहर दान करून टाकण्‍याचे कारस्‍थान तर नाही ना असा संशय व्‍यक्‍त केला जात आहे.

मडगाव शहरात पर्यटकांना आकर्षित करण्‍यासाठी म्‍युझियम सुरू करण्‍याबरोबरच सध्‍याचे मडगावचे बंदिस्‍त असलेले नगरपालिका उद्यान खुले करून त्‍यात लोकांना चालून जाण्‍यासाठी आकर्षक वाटा ठेवण्‍याचा प्रस्‍ताव आहे. त्‍याशिवाय शॉपिंग मॉल्‍स आणि अन्‍य सुविधा असलेले सामाजिक समुदाय हब तसेच कृषी उत्‍पादनाला उत्तेजन देण्‍यासाठी कृषी तांत्रिक उद्योग विभाग अशा अनेक नवीन गोष्‍टी त्‍यात दाखविण्‍यात आलेल्‍या आहेत.

सध्‍या मडगावच्‍या मध्‍यवर्ती ठिकाणी असलेल्या कोमुनिदाद प्रशासकीय इमारतीचे रूपांतर म्‍युझियममध्‍ये करून त्‍यात गोवा मुक्‍ती चळवळीशी संबंधित वस्‍तूंचे दालन सुरू करण्‍याच्‍या प्रस्‍तावाबरोबरच नगरपालिका उद्यान खुले करून त्‍यात लोकांसाठी आकर्षक पायवाटा तयार करण्‍याचाही प्रस्‍ताव आहे.

कोकण रेल्‍वे स्‍थानकासमोरील बसस्थानकासाठी संपादित शेतजमिनीत कृषी तांत्रिक उद्योग आणण्‍याबरोबरच लोकांसाठी आकर्षक मॉल उघडण्‍याची तजवीज आहे. मोतिडोंगरावर सामाजिक समुदाय हब उभारण्‍याचा प्रस्‍ताव असून रवींद्र भवनाजवळील जागा सांस्‍कृतिक कार्याचे हब म्हणून निश्चित करण्‍यात आली आहे. यामुळे मडगाव शहराचा चेहरामोहराच बदलेल, असा दावा आमदार दिगंबर कामत यांनी केला असून मडगाव शहरातील पुढच्‍या गरजा लक्षात ठेवून हा आराखडा तयार केल्‍याचे ते म्हणाले.

कोकण रेल्‍वे स्‍थानकासमोरील बसस्‍थानकासाठी संपादित केलेल्या जागेत कृषी तांत्रिक उद्योग उघडण्‍यात येणार असल्याचे म्हटले आहे. मात्र, प्रत्‍यक्षात तेथे कसले उद्योग येतील यासंदर्भात कोणतेही स्‍पष्‍टीकरण दिलेले नाही.

मोतिडोंगरावर सामाजिक समुदाय हब उभारण्याचे आराखड्यात म्हटले आहे, पण ते नेमके काय आणि कोणत्या जागेत होणार याचाही उल्‍लेख नाही. ज्‍या जागेत हा हब उभारणार असे सांगितले जाते, ती जी जागा आरोग्‍य खात्‍याची आहे. त्‍या जमिनीवर हबच्‍या नावाखाली काँक्रीटचे जंगल उभारण्‍याचा डाव तर नाही ना अशी शंका घेण्‍याजोगी ही बाब आहे, असे सावियो कुतिन्हो यांनी सांगितले.

‘आराखडा खुला का केला जात नाही?’

शॅडो कौन्‍सिलचे निमंत्रक सावियो कुतिन्‍हो यांनी हा आराखडा लोकांना पाहण्‍यासाठी खुला करा आणि नगरपालिकेच्‍या वेबसाइटवर तो अपलोड करा अशी आमची मागणी आहे, परंतु ती पूर्ण का केली जात नाही असा सवाल केला. हा आराखडा तयार करताना त्यात मोठमोठे ‘शद्बां’चा वापर केला आहे. मात्र, या शद्बांचा नक्‍की अर्थ काय याचे स्‍पष्‍टीकरण कुणी देत नाहीत, असा दावाही त्‍यांनी केला आहे.

‘मास्टर प्लॅन 2041’ अंतिम नाही: पिळर्णकर

जीसुडाने सल्लागाराकडून तयार केलेला मडगावचा ‘मास्टर प्लॅन २०४१’ हा अंतिम नाही. मडगावच्या नगरसेवकांना त्याचे सादरीकरण करण्यात आले आहे. हा केवळ पहिला टप्पा असल्याचे नगरपालिका प्रशासन संचालनालयाचे संचालक गुरुदास पिळर्णकर यांनी सांगितले. नगरविकासमंत्री विश्र्वजीत राणे यासंदर्भात मडगाव व फातोर्ड्याच्या आमदारांबरोबर चर्चा करणार आहेत. मास्टर प्लॅन तयार कुणी करावा याबद्दल काहीही बंधन नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: नो पार्किंगचा फलक काय कामाचा!

Thailand Cambodia Conflict: 32 ठार, 58 हजार स्थलांतरीत; थायलंड-कंबोडिया सीमेवरील तणाव, न्यूयॉर्कमध्ये बंद दाराआड बैठक

Quepem: भले मोठे झाड कोसळले, घराच्या 6 खोल्या जमीनदोस्त; केपेतील दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात नुकसान

Goa Monsoon Flowers: 'सोनेरी हरणा, गुलाबी तेरडे, शुभ्र तुतारी'! श्रावणातील फुलांचा अवर्णनीय सोहळा

Khazan Farming: गोव्यातील शेकडो वर्षांपूर्वीची परंपरा धोक्यात! खारफुटींचे अतिक्रमण वाढले; खाजन शेती मरणासन्न

SCROLL FOR NEXT