Konkan Railway Theft Dainik Gomantak
गोवा

Railway Theft: धक्कादायक! रेल्वे प्रवासात झोप लागली, चोरट्याने पळवली महिलेची हॅन्डबॅग; 15 लाखांचा ऐवज लंपास

Konkan Railway Theft: रेल्वे प्रवासात महिलांना लुबाडण्याच्या घटना वाढू लागल्या असून, मडगाव ते राजस्थान दरम्यान प्रवास करणाऱ्या एका महिलेचे हॅण्ड बॅग पळवून १५ लाखांचा ऐवज लुटला.

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: रेल्वे प्रवासात महिलांना लुबाडण्याच्या घटना वाढू लागल्या असून, मडगाव ते राजस्थान दरम्यान प्रवास करणाऱ्या एका महिलेचे हॅण्ड बॅग पळवून १५ लाखांचा ऐवज लुटला.

या प्रकरणी कांथा मालविया (३८) या प्रवासी महिलेने मडगावच्या कोकण रेल्वे पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी अज्ञातावर भारतीय न्याय संहितेच्या ३०५ (क) कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक राहूल नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रज्ञा जोशी पुढील तपास करीत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरीची वरील घटना ८ फेब्रुवारी रोजी घडली होती. तक्रारदार मडगाव रेल्वे स्थानकावरून प्रवासासाठी रेल्वेत चढल्या होत्या. त्यानंतर त्या झोपी गेल्या. पनवेल येथे पोहोचल्यानंतर त्यांना जाग आली असता, आपले हॅण्ड बॅग चोरीला गेल्याचे तिला आढळून आले.

या बॅगेत सोन्याचे मंगळसूत्र, बांगड्या, अंगठी मिळून १५ लाखांचा ऐवज होता. प्रवासी झोपेत असताना हॅण्डबॅग व पर्स पळवल्या जात आहेत.आतापर्यंत अशा घटनांत लाखोंचा ऐवज चोरीला गेला असून, या घटनांचा तपास अजूनही लागला नाही. चोरीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांनी वस्तूंची काळजी घ्यावी व चोरीच्या घटना घडल्यास त्वरित रेल्वे सुरक्षा दलाकडे संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

लांबच्या प्रवासात महिलांच्या हॅण्डबॅग पळविल्या जात असून , भल्या पहाटे या चोऱ्या होत असतात. प्रवासी गाढ झोपेत असतात. तीच संधी हेरून चोरटे चोरी करतात असे आढळल्याचे पोलिस निरीक्षक राहूल नाईक यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Telangana Accident: किंकाळ्या अन् आक्रोश! अनियंत्रित बसची कंटेनरला जोरदार धडक, 6 ठार, 20 जखमी; तेलंगणात भीषण अपघात

Goa Drug Racket: आशा, रोविनानंतर आता पोक्सो कैदी योगेश मांद्रेकरही अटकेत; कोलवाळ जेल ड्रग्स प्रकरणात तिसरी कारवाई

Goa Municipal Elections: विधानसभेपूर्वीच पालिका निवडणुका! 11 नगरपालिकांसाठी कोर्टाचा मोठा आदेश, 4 जानेवारीपर्यंत निकाल

Operation Sindoor: ''शेवटचा वार भारताचाच असणार होता''!, 'ऑपरेशन सिंदूर'बाबत माजी CDS अनिल चौहान यांचा धक्कादायक खुलासा; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानची दैना VIDEO

Horoscope 26 August 2026: बुधवार 'या' राशींसाठी ठरणार वरदान! करिअरमध्ये मिळणार गरुडभरारीची संधी; उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होणार

SCROLL FOR NEXT