Margao SGPDA Market Dainik Gomantak
गोवा

SGPDA Market: 'आदेश पाळा, अन्यथा कारवाई करु'! मडगावातील व्यापाऱ्यांना ताकीद; ठरवून दिलेल्या जागेत व्यापार करण्याचे आवाहन

Margao SGPDA Market: : मडगाव येथील एसजीपीडीए किरकोळ मासळी तसेच भाजी मार्केटमधील व्यापाऱ्यांना आता आखून दिलेली जागेतच व्यापार करावा लागणार आहे.

Sameer Panditrao

सासष्टी: मडगाव येथील एसजीपीडीए किरकोळ मासळी तसेच भाजी मार्केटमधील व्यापाऱ्यांना आता आखून दिलेली जागेतच व्यापार करावा लागणार आहे. अन्यथा सोमवारपासून कारवाईला सामोरे जावे लागेल, असे एसजीपीडीएचे अध्यक्ष दाजी साळकर यांनी बजावले आहे.

येथील व्यापारी आखून दिलेली जागा सोडून गिऱ्हाईकांना फिरण्यासाठी जी मोकळी जागा ठेवली आहे तिथे आपले साहित्य ठेवतात. त्यामुळे मार्केटमध्ये फिरणे कठीण होते. तसेच भाजी विक्रेते शिल्लक भाजी तिथेच टाकून देण्याचे प्रकार घडत आहेत.

दोन दिवसांपूर्वी एसजीपीडीएने या सर्व व्यापाऱ्यांना नोटीस पाठवून स्वच्छता राखण्याचे तसेच केवळ आपल्या जागेवरच धंदा करण्याचा आदेश दिला होता. शुक्रवारी साळकर यांनी अधिकाऱ्यांसमवेत या मार्केटची प्रत्यक्ष पाहणी केली. ते व्यापाऱ्यांशी बोलले व सोमवारपासून दिलेला आदेश काटेकोरपणे पाळावा अन्यथा कारवाईस सामोरे जावे लागेल असे सांगितले.

संपूर्ण मार्केटचे नूतनीकरण करणार

या मार्केटच्या संपूर्ण नूतनीकरणाचा विचार आहे. त्याचा आराखडा तयार केला जाईल व सरकारच्या मंजुरीनंतर कामाला सुरवात केली जाईल, असेही साळकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Human Trafficking: फोंड्यात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश, पीडित तरुणीची सुटका; पश्चिम बंगाल, यूपीतील 3 जणांना अटक

Patri Ganpati Goa: दक्ष राजाच्या यज्ञावेळी अपमानीत झालेल्या देवी 'पार्वती'ने यज्ञकुंडात उडी घेतली; गोव्यातील पत्री पूजनाची परंपरा

गुळातही सापडली भेसळ! राज्यात प्रोटीनच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्यांना FDAचा दणका

Goa: 'शॅक चालक, पर्यटन खाते, मच्छीमार सर्वांचे सहकार्य महत्वाचे'! सागरी वन्यजीवांच्या संरक्षणासाठी स्वतंत्र सुटका केंद्राची मागणी

Goa Live Updates: फोंड्यात मानवी तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; एका तरुणीची सुटका, तिघांना अटक

SCROLL FOR NEXT