सासष्टी: मडगावातील एसजीपीडीए घाऊक मासळी मार्केटपासून सुमारे २०० मीटर अंतरावर सुरावली येथे मागील कित्येक दिवसांपासून बेकायदा मासळी विक्री सुरू होती. येथे कुजलेली मासळी विकली जाते, अशी लोकांची तक्रार होती. याची दखल घेत बाणावलीचे आमदार वेन्झी व्हिएगश यांनी उपजिल्हाधिकारी मोहमद शबीर व एफडीए अधिकारी जे. कुडाळकर यांच्यासमवेत पाहणी केली व विक्रेत्यांना तिथून हटविले. तसेच विक्रीला ठेवलेल्या मासळीचे नमुने गोळा केले. चाचणी करून दोन ते तीन दिवसांत अहवाल तयार होईल असे सूत्रांनी सांगितले.
तसेच जलस्रोत खात्याच्या प्रकल्पाबाहेरही मासळी मार्केट सुरू झाले आहे. सध्या मडगाव परिसरात कित्येक ठिकाणी रस्त्याच्या बाजूला बसून मासळी विक्री केली जाते. पालिका इमारतीमागे पूर्वीच्या मासळी मार्केट जवळील रस्त्यावर जिथे पार्किंग प्रकल्प अपेक्षित आहे, तिथेही मासळी विक्री सुरू आहे.
तसेच टेम्पो स्टॅंड जवळील बोरकर सुपर स्टोअर्सच्या समोर, रावणफोंड, दवर्ली आदी भागात मासळी विक्री केली जाते अनेक ठिकाणी रस्त्याच्या बाजूला वाहने उभी करून मासळी विकली जात आहे. बहुतेक ठिकाणी कुजलेली मासळीच विकली जाते, असे लोक सांगतात.
रस्त्यावरील मासळी विक्रीमुळे वाहतुकीला अडथळा होतो शिवाय परिसरात दुर्गंधी पसरलेली असते. या विक्रेत्यांवर मडगाव पालिका काही कारवाई करेल का, असा प्रश्न नागरिक विचार आहेत.
वाहनात ठेवतात लपवून
मडगावचे सोपो कंत्राटदार मिलाग्रेस फर्नांडिस यांनी हे विक्रेते कुजलेली मासळी विकतात, असे सांगितले. रस्त्याच्या बाजूला वाहने ठेवलेली असतात, तिथे ही मासळी लपवून ठेवलेली असते. एरव्ही कुजलेली मासळी कुंकळ्ळी औद्योगीक वसाहतीतील मासळी प्लांटमध्ये पाठवली जाते.
परंतु काही मासळी विक्रेत्या महिला पहाटे जेव्हा वाहनांतून मासळी आणली जाते, तेव्हा तिथे मासळीच्या टोपल्या वगैरे उचलायला उपस्थित असतात. त्यावेळी सडलेली मासळी लपवून ठेवतात व त्या किंवा त्यांचे इतर हस्तक ही मासळी ताजी म्हणून विकतात, असे सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.