Wanted | Crime Canva
गोवा

Margao Crime: मडगाव अपहरण प्रकरणाला जुन्या वादाची किनार! ‘रुबेन’ अद्याप फरारच

Margao Kidnapping Case: मडगावचे सोन्‍याचे व्‍यावसायिक कुणाल रायकर यांच्‍या अपहरणाच्‍या प्रकरणातील मुख्‍य सूत्रधार असण्‍याची शक्‍यता असलेला मडगावातील आणखी एक सोन्‍याचा व्‍यापारी रुबेन वेर्णेकर हा अद्याप फरार आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Margao Raikar Kidnapping Case

मडगाव: मडगावचे सोन्‍याचे व्‍यावसायिक कुणाल रायकर यांच्‍या अपहरणाच्‍या प्रकरणातील मुख्‍य सूत्रधार असण्‍याची शक्‍यता असलेला मडगावातील आणखी एक सोन्‍याचा व्‍यापारी रुबेन वेर्णेकर हा अद्याप फरार आहे. मडगाव पोलिस त्‍याच्‍या मागावर असल्‍याची माहिती पोलिस अधीक्षक संतोष देसाई यांनी दिली.

वेर्णेकर याने या प्रकरणात आपल्‍याला अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी अर्ज केला होता. मात्र, शुक्रवारी दक्षिण गोव्‍याच्‍या अतिरिक्‍त सत्र न्‍यायाधीश क्षमा जोशी यांनी ताे अर्ज फेटाळून लावला होता. यानंतर मडगाव पोलिसांकडून त्‍याचा शोध घेण्‍याचा प्रयत्‍न सुरू आहे.

संशयित वेर्णेकर अजून आम्‍हाला सापडलेला नाही. मात्र, आम्‍ही त्‍याच्‍या मागावर आहोत. मिळेल तेथून आम्‍ही त्‍याला अटक करू, अशी माहिती पोलिस अधीक्षक संतोष देसाई यांनी दिली.

आके-मडगाव येथील बेबी ब्‍लॉझम या शाळेत शिकणाऱ्या आपल्‍या मुलाला शाळेत पोहोचवून परत येताना गुरुवारी सकाळी रायकर यांच्या अपहरणाचा प्रयत्‍न झाला होता. ३ अज्ञात अपहरणकर्त्यांनी बंदुकीचा धाक दाखवून रायकर यांना गाडीत कोंबण्‍याचा प्रयत्‍न केला होता. मात्र, त्‍यावेळी रायकर यांनी झटापट केल्‍याने अपहरणकर्त्यांच्या बंदुकीतील मॅगझीन खाली पडली होती, त्‍यामुळे या अपहरणाचा प्रयत्‍न फसला होता.

आधीपासूनच होता दोघांमध्ये वाद

यापूर्वी कुणाल आणि रुबेन यांच्‍यात एका दुकानाच्‍या खरेदीवरून वाद सुरू होता. कुणालने रुबेनकडून तीन कोटी रुपये घेतले होते. त्‍याबदल्‍यात तो त्‍याला दुकान विकणार होता; पण हा सर्व व्‍यवहार फिसकटल्‍याने आपले पैसे परत घेण्‍यासाठी रुबेनने कुणालला यापूर्वी धमकीही दिली हाेती. त्‍यामुळे या अपहरणाच्‍या प्रयत्‍नात रुबेन याचाच हात असावा, अशी तक्रार कुणाल रायकर यांनी मडगाव पोलिसांत केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT