Margao Police Station Dainik Gomantak
गोवा

Margao Police Station: झुरळे-डासांनीच सरकारला जाग! पोलिस ठाण्याच्या स्थितीवर प्रभव यांची सडकून टीका

Margao police station dengue cases: मडगाव पोलिस स्थानकातील डेंग्यूच्या प्रकरणांचा मुद्दा ७ ऑगस्ट रोजी उपस्थित केल्यानंतर सरकारला अखेर दखल घ्यावी लागली.

गोमंतक ऑनलाईन टीम

मडगाव: मडगाव पोलिस स्थानकातील डेंग्यूच्या प्रकरणांचा मुद्दा ७ ऑगस्ट रोजी उपस्थित केल्यानंतर सरकारला अखेर दखल घ्यावी लागली. मडगावचे आमदार तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत यांनी १३ ऑगस्ट रोजी पोलिस स्थानकाला भेट देऊन तेथील दयनीय परिस्थितीची पाहणी केली, असा दावा ‘मडगांवचो आवाज’चे युवा नेते प्रभव नायक यांनी केला आहे.

नायक म्हणाले की, ही पाहणी ‘मडगांवचो आवाज’ने सातत्याने उपस्थित केलेल्या प्रश्नांचा थेट परिणाम असून, जनदबावामुळे सरकारला कृती करण्यास भाग पाडता येते, हे यातून स्पष्ट झाले आहे. “ज्या पोलीस आस्थापनाकडे यापूर्वीच लक्ष दिले जाणे आवश्यक होते, त्याची दयनीय अवस्था पाहण्यासाठी सरकारला डेंग्यूची प्रकरणे, डासांचे चावे आणि झुरळांचा उपद्रव निर्माण होईपर्यंत वाट पाहावी लागली, हे दुर्दैवी आहे,” असे ते म्हणाले.

सरकारवर टीका करताना प्रभव नायक म्हणाले, “कदाचित झुरळे आणि डासांच्या चाव्यांनी ते काम केले आहे, जे वारंवार केलेल्या सूचना आणि जनतेच्या मागण्यांना करता आले नाही. त्यांनीच अखेर सरकारला जागे केले आहे. मडगाव पोलिस स्थानक, दक्षिण गोवा व कुशावती जिल्हा पोलिस मुख्यालय तसेच लगतच्या पोलीस निवासस्थानांची अवस्था ही अत्यावश्यक सार्वजनिक पायाभूत सुविधांकडे सरकारने केलेल्या दुर्लक्षाचे गंभीर उदाहरण असल्याचा आरोपही त्यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

जगाचा नकाशा अचूकतेने मांडण्याच्या UN च्या प्रस्तावाला भारताचा पाठिंबा, पण J&K आणि लडाखच्या सीमांबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिला स्पष्ट इशारा

Keri Ambulance Service: केरीला मिळाली 3 दिवसांत 108 रुग्णवाहिका; विधानसभेत आरोलकरांनी प्रश्न उपस्थित करताच सरकारची कार्यवाही

Accident Death: दारूची नशा बेतली जीवावर; दुचाकीवरील ताबा सुटला, नाल्यात पडून 30 वर्षीय युवकाचा मृत्यू

Bank Job: SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 12,000 जागांसाठी होणार मेगाभरती, 250 नव्या शाखा सुरू करण्याचा बँकेचा प्लॅन

Congress Dalit Tribal Support: दलित-आदिवासींची साथ मिळवणे काँग्रेससाठी सोपे नाही! राहुल गांधींसमोर मोठे राजकीय आव्हान

SCROLL FOR NEXT