Guidence for Physical Education Dainik Gomantak
गोवा

Physical Education :दामोदर वाणिज्य महाविद्यालयात शारीरिक शिक्षणावर राष्ट्रीय परिषद

मान्यवरांची उपस्थिती : क्रीडा क्षेत्राशी निगडित संशोधनावर मार्गदर्शन

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव : येथील दामोदर वाणिज्य महाविद्यालयाच्या शारीरिक शिक्षण विभागातर्फे गेल्या ५ व ६ एप्रिल असे दोन दिवस शारीरिक शिक्षण आणि क्रीडा यावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले. शारीरिक शिक्षण आणि क्रीडा या माध्यमातून जीवनाची वृध्दी ही या परिषदेची संकल्पना होती.

या परिषेदच्या उद्‌घाटन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून गोवा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. हरीलाल मेनन उपस्थित होते, तर प्रमुख वक्ते म्हणून ग्वाल्हेर येथील लक्ष्मीबाई राष्ट्रीय शारीरिक शिक्षण आणि क्रीडा संस्थेचे कुलगुरू प्रा. विवेक पांडे उपस्थित होते. प्राचार्य प्रीता मल्ल्या यांनी उपस्थितांचे स्वागत केले. त्यानंतर प्रा. हरीलाल मेनन यांनी क्रीडा क्षेत्राशी निगडीत संशोधनाविषयी मार्गदर्शन केले. प्रा. विवेक पांडे यांनी व्यायाम आणि शरीर विज्ञान शास्त्र या विषयावर व्याख्यान दिले. प्राचार्य प्रीता मल्ल्या यांनी प्रमुख पाहुणे व प्रमुख वक्ते यांना स्मृतीचिन्हे प्रदान केली. डॉ. लिना सडेकर यांनी आभार मानले.

उद्‌घाटन सोहळ्यानंतरच्या पहिल्या सत्रात इंदूरच्या देवी अहिल्यादेवी विद्यापीठाचे डीन डॉ. दयानंद सनसनवाल यांनी सूत्रधाराची भूमिका बजावली. शर्मिला कुंदे यांनी त्यांचा परिचय करून दिला. दुसऱ्या सत्राच्या अध्यक्षस्थानी पेडणे सरकारी महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक डॉ. सॅम ब्रागांझा होते. तांत्रिक सत्राच्या अध्यक्षस्थानी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या डॉ. सुमन पांडे उपस्थित होत्या. त्यांचा परिचय शर्मिला कुंदे यांनी करून दिला. या सत्राचे आयोजन ऑनलाईन करण्यात आले होते. ऑफलाईन तांत्रिक सत्राच्या अध्यक्षस्थानी प्रा. विवेक पांडे उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saptakoteshwar Temple History: शिल्पावशेषांतून उलगडतोय दिवाडीच्या सप्तकोटेश्वर मंदिराचा इतिहास; कदंब स्थापत्याला नवा उजाळा

Iran America Conflict: "हबीबी, इराणला या!" युद्धाच्या धमकीवर तेहराननं उडवली ट्रम्पची खिल्ली; 3 डी गेमचा VIDEO केला शेअर

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाआधी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी; सुप्रीम कोर्टाचा 'MACP' संदर्भात महत्त्वाचा निर्णय

DJ Controversy: पुण्यात 'DJ'चा सवाल; गोव्यात नरकासुराचे काय?

Guru Gochar 2026: करिअरमध्ये मोठी झेप अन् छप्परफाड पैसा! गुरुच्या नक्षत्र परिवर्तनानं 4 राशी होणार मालामाल; गोल्डन टाईम सुरु

SCROLL FOR NEXT