Nodal Officer Kashinath Shetye Dainik Gomantak
गोवा

Kashinath Shetye: बेकायदा गाड्यांवर कारवाई, काशिनाथ शेटयेंचा मडगाव कार्यालयाचा ताबा घेतला काढून; 'राजकारण' झाल्याची चर्चा

Kashinath Shetye Margao: काही गाडे वीज खात्‍याच्‍या मालकीच्‍या फुटपाथवर उभे केले होते. हे गाडे हटविण्‍यात यावेत, यासाठी शेटये यांनी जिल्‍हाधिकारी यांच्‍याकडे तक्रार केली होती.

Sameer Panditrao

मडगाव: बेकायदा गाड्यांवर कारवाई करणारे वीज खात्‍याचे कार्यकारी अभियंते काशिनाथ शेटये यांच्याकडील मडगाव कार्यालयाचा अतिरिक्त ताबा आज तडकाफडकी काढून घेण्याचा आदेश आज जारी करण्यात आला.

असे असले तरी वीज खात्याच्या मालमत्तांची देखरेख करण्यासाठी त्यांना देण्यात आलेला नोडल अधिकारी पदाचा ताबा मात्र कायम ठेवण्यात आला आहे. शेटये यांनी मडगावातील बेकायदेशीर गाड्यांच्‍या विरोधात जिल्‍हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. त्यामुळे ते चर्चेत आले होते. त्यानंतर हा आदेश आज जारी झाला.

शेटये यांच्‍या या आदेशामागे हे गाड्यांचेच राजकारण असल्‍याचे सांगितले जाते. शेटये यांनी ज्‍या गाड्यांच्‍या विरोधात तक्रार केली होती, ते गाडे राजकीय आशीर्वादाने उभे झाले होते, असा आरोप केला जात हाेता. त्‍यातील काही गाडे वीज खात्‍याच्‍या मालकीच्‍या फुटपाथवर उभे केले होते. हे गाडे तसेच रस्‍ता रुंदीकरणाच्‍या जागेतील गाडे हटविण्‍यात यावेत, यासाठी शेटये यांनी जिल्‍हाधिकारी यांच्‍याकडे तक्रार केली होती.

त्‍यानंतर दक्षिण गोव्‍याच्‍या जिल्‍हाधिकारी ॲग्‍ना क्‍लिटस यांनी हे गाडे हटविण्‍याचा आदेश मडगाव पालिकेच्‍या मुख्‍याधिकाऱ्यांना दिला होता. यासंदर्भात शेटये यांच्याशी संपर्क साधला असता हा आदेश का जारी केला, त्याची आपल्याला कल्पना नाही.

पण मी बेकायदेशीर गाड्यांच्या विरोधात जी तक्रार दिली होती, ती वैयक्तिक स्वरूपाची होती आणि त्या तक्रारीचा वीज खात्याच्या कामकाजाशी काहीच संबंध नाही, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. माझ्या तक्रारीचा मी शेवटपर्यंत पाठपुरावा करणार, असे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

पालकांनो, मुलांच्या हाती फोन देताय? त्याआधी ऑन करा 'या' 5 सेटिंग्ज, अश्लील कंटेंटला बसेल कायमचा लगाम

VIDEO: 'मला वाटलं होतं खूप घाण असेल, पण...' भारतीय रेल्वेच्या प्रवासाने विदेशी तरुणी भारावली; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

IPL 2025: RCB फॅन्ससाठी मोठी बातमी! चिन्नास्वामी स्टेडियमवर सामने होणार की नाही? कर्नाटक सरकारने घेतला 'हा' मोठा निर्णय

Goan Solkadhi: गोंयकाराची पहाटेची स्वप्नं दाट गुलाबी असतात, कारण त्यात 'सोलकढी'तल्या सोलाचा गडद रंग आणि नारळाच्या रसातला दाटपणा असतो..

तेंव्हा इकडे स्वतंत्र भारत, तर तिकडे गोवा होता! याबाजूला भारतीय जवान तर तिकडे पाकल्यांचे ‘सोजीर’ बंदुका घेऊन ताठ उभे होते..

SCROLL FOR NEXT