Margao News:  Dainik Gomantak
गोवा

Margao News: गांधी मार्केटमध्ये बाहेरून येणारी तांबडी भाजी विकू देणार नाही; बाबू आजगावकर

मडगाव पालिकेवर व्यापाऱ्यांची धडक; अर्धा दिवस मार्केट बंद

Akshay Nirmale

Margao News: मडगाव येथील गांधी मार्केटमधील व्यापाऱ्यांनी आज, मंगळवारी मडगाव पालिकेवर मोर्चा काढला. यावेळी मुख्याधिकारी आणि नगराध्यक्ष अनुपस्थित होते. त्यामुळे चिडलेल्या व्यापाऱ्यांनी माजी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांच्या सह प्रवेशद्वारावरच ठिय्या मांडला. दरम्यान, यावेळी बाहेरून येणारी तांबडी भाजी मार्केटमध्ये विकू देणार नाही, असे बाबू आजगावकर यांनी सांगितले.

पोलिसांनी सर्व आंदोलकांना तिथेच अडवून धरले होते. बराच वेळ तिथे गोंधळ सुरू होता. आंदोलकांकडून घोषणाबाजीही करण्यात आली. सर्व आंदोलक व्यापारी नगराध्यक्ष आणि मुख्याधिकाऱ्यांच्या प्रतिक्षेत तिथेच काहीकाळ ठिय्या मांडून होते.

या वेळी गांधी मार्केट असोसिएशनच्या या व्यापाऱ्यांनी मुख्य प्रवेशद्वारच अडवून धरले. नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी जोवर शिष्टमंडळाची भेट घेत नाहीत तोवर येथून हलणार नसल्याचा पवित्रा त्यांनी घेतला.

काही वेळाने नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी आल्यानंतर त्यांच्या कक्षात शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली. यावेळी मार्केटमधील अतिक्रमणे काढा, स्वच्छता ठेवा, रिनोव्हेशन करा, अवैध प्रकार थांबवा, बाहेरून येणारी फुले विक्री करू देण्यास बंदी घाला इत्यादी मागण्या करण्यात आल्या.

आजपासून मार्केटमध्ये गोव्याच्या बाहेरून येणारी तांबडी भाजी विकली जाणार नाही. केवळ गोव्यातील तांबडी भाजीच मार्केटमध्ये विकली जाईल, असे बाबू आजगावकर यांनी सांगितले.

मडगावचे नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांनी शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकून घेतले आणि बेकायदेशीर जे काही असेल त्यावर कारवाई करतो, तसचे मार्केट रिनोव्हेशनचे प्लॅन आखला जात आहे, असे स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT