Goa | Margao Municipality Dainik Gomantak
गोवा

Margao Municipality: 'मडगाव नगरपालिकेने स्वत:ला दिवाळखोर म्‍हणून घोषित करावे'

गेल्‍या कित्येक दिवसांपासून फातोर्डा येथील वाहतूक सिग्नल्स कार्यरत नाहीत. त्यासाठी दोन लाख रुपयांचा खर्च येईल. जर एवढा निधीही नसेल तर पालिकेने स्वत:ला दिवाळखोर घोषित करावे. असे आमदार विजय सरदेसाई म्‍हणाले.

दैनिक गोमन्तक

Margao Municipality: गेल्‍या कित्येक दिवसांपासून फातोर्डा येथील वाहतूक सिग्नल्स कार्यरत नाहीत. त्यामुळे बोलशे सर्कल व आर्लेम सर्कल येथे अपघाताची भीती व्‍यक्त करण्‍यात येत आहे. याबाबत नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांची भेट घेऊन वाहतूक सिग्नल्स दुरुस्त करण्याची मागणी भाजप कार्यकर्ते आणि स्‍थानिकांनी केली.

मात्र शिरोडकर यांनी हे सिग्नल्स अजूनही नगरपालिकेच्या ताब्यात नसल्याचे सांगून वेळ मारून नेली. दरम्‍यान, या समस्‍या दूर करण्‍यासाठी निधी नसेल तर पालिकेने स्वत:ला दिवाळखोर घोषित करावे.

तसे केल्यास आपण स्वत: हे सिग्नल्स दुरुस्त करण्यास पुढाकार घेऊ, असे आव्‍हान फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी दिले आहे.

कचरा समस्‍या तीव्र होण्‍याबरोबरच आता वाहतूक सिग्नल्सअभावी लोकांचा जीव धोक्‍यात आला आहे. या दोन्ही गोष्टी सरकारने पुरवाव्यात. पण सरकारकडे त्यासंदर्भात योजनाच नाही.

मडगाव नगरपालिकेत गोवा फॉरवर्डची सत्ता होती, तेव्हा ‘व्ही फॉर फातोर्डा’च्या नावाखाली वाहतूक सिग्नल्सची व्यवस्था केली होती. त्या कंपनीशी आमचा पाच वर्षांचा करार होता.

हा करार आता संपला आहे व यापुढे नगरपालिकेने पुढाकार घेऊन कंपनीकडे देखभालीसाठी करार करणे गरजेचे आहे. त्यासाठी पालिकेला वर्षाकाठी दोन लाख रुपयांचा खर्च येईल. जर एवढा निधीही नसेल तर पालिकेने स्वत:ला दिवाळखोर घोषित करावे. तसे केल्यास आपण स्वत: हे सिग्नल्स दुरुस्त करण्यास पुढाकार घेऊ, असे सरदेसाई म्‍हणाले.

दिगंबर कामत यांनी पाच महिन्‍यांत काय केले?

सोनसोडो कचरा प्रक्रिया प्रकल्‍पाबाबत बोलताना विजय सरदेसाई म्हणाले की, काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी नगर विकासमंत्र्यांकडून निधी उपलब्ध करून घ्यावा.

कचरा व्यवस्थापनमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी गेल्या वर्षी सोनसोडोला भेट दिली होती. तेव्‍हा कामतही उपस्थित होते. सोनसोडो कचरा प्रश्र्न योग्य उपाययोजना आखून सोडविण्याचा निर्णय त्‍यावेळी घेण्यात आला होता.

पण अद्याप एकही काम पूर्ण झालेले नाही याचेच आश्र्चर्य वाटते असेही सरदेसाई यांनी सांगितले. काँग्रेसमधून भाजपमध्ये गेल्यावर आमदार कामत यांनी पाच महिन्यांत सोनसोडोसाठी काय केले हे मडगाव व फातोर्ड्याच्‍या नागरिकांना सांगावे असे आव्हानही सरदेसाई यांनी दिले आहे.

वाहतूक सिग्नल्स नगरपालिकेच्या ताब्यात देण्याचा प्रश्र्नच कुठे उद्‌भवतो? या सिग्नल्सना आपण कुलुपे लावलेली नाहीत. नगरपालिकेने कचरा व वाहतूक सिग्नल्सचा प्रश्र्न राजकीय करु नये. लोकांचे हित जपावे. वाहतूक सिग्नल्स कंपनीकडे सात दिवसांत वार्षिक देखभाल करार करावा. - विजय सरदेसाई, आमदार, फातोर्डा

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"मोदी विरोधकांना घाबरवतात म्हणून मी तसे म्हणालो", मल्लिकार्जुन खर्गेंचं 'त्या' जहरी टीकेवर स्पष्टीकरण; भाजपकडून माफीची मागणी कायम VIDEO

VIDEO: 'गुजराती अडाणी' नंतर आता पंतप्रधान मोदी 'आतंकवादी'! मल्लिकार्जुन खर्गे यांची जीभ पुन्हा घसरली; तामिळनाडूचं राजकीय वातावरण तापलं

PM Kisan 23rd Installment: ठरलं! 'या' दिवशी खात्यात जमा होणार 2,000 रुपये, आजच उरका 'ही' 4 महत्त्वाची कामं अन्यथा पैसे अडकणार

Women Reservation Bill 2026: 30 वर्षांची प्रतीक्षा अन् शेवटी निराशाच! लोकसभेत 'महिला आरक्षणा'चं स्वप्न का भंगलं?

Operation Sindoor: घरात घुसून पाकड्यांना ठोकलं! एक वर्षांनंतरही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळात; 'ऑपरेशन सिंदूर'नं मोडलं कंबरडं

SCROLL FOR NEXT