Margao Municipality Dainik Gomantak
गोवा

Margao Municipality: मडगाव पालिका कचरा हाताळणीत अकार्यक्षम

Margao Municipality: मुख्यमंत्र्यांचा शेरा : यापुढे गोवा राज्य कचरा व्यवस्थापन महामंडळाकडे जबाबदारी

दैनिक गोमन्तक

Margao Municipality: मडगावातील ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी उभारण्यात आलेल्या बायोमिथेनेशन प्रकल्पाच्या फसलेल्या प्रयोगानंतर आता गोवा राज्य कचरा व्यवस्थापन महामंडळ मडगावातील कचरा हाताळणी करणार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत तसा प्रस्ताव सादर केला.

ते म्हणाले, आधीच्या प्रयोगातून मडगाव पालिका सक्षमपणे हा प्रश्न हाताळू शकत नसल्याने पालिकेने कचरा कर महामंडळाकडे जमा करावा, प्रकल्प उभारण्यापासून तो चालवण्यास देण्यापर्यंत सारी व्यवस्था महामंडळ हाताळेल, असा प्रस्ताव पालिकेला दिला आहे. तो त्यांनी स्वीकारला तर कचरा समस्या सुटू शकते.

फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी याविषयी प्रश्न विचारला होता. ते म्हणाले, बायोमिथेनेशन प्रकल्पात मासे घेणे बंद केले, मासळी बाजारातील प्रकल्पात मासळीच घेतली जाणार नाही तर त्याचा उपयोग काय.

सशुल्क सेवा देणार

मुख्यमंत्री म्हणाले, काकोडा येथील प्रकल्पात सगळा कचरा नेला जाऊ शकत नाही. काणकोण, सांगे, केपे आणि धारबांदोडा तालुक्यातील कचरा तेथे येऊ लागल्यावर त्या प्रकल्पाची क्षमता पूर्ण होईल. त्यामुळे मडगावच्या कचऱ्यावर मडगावातच प्रक्रिया करावी लागेल. त्यासाठी गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळ आता सशुल्क अशी ही सेवा देणार आहे.

कायमस्वरूपी तोडगा काढा

कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स म्हणाले, या प्रकल्पांमुळे आमदारांवर लोक आरोप करतात. आणखीन असे आरोप नको. याप्रश्नी सरकारने कायमस्वरूपी तोडगा काढला पाहिजे. सोनसड्यावर चांगल्या तंत्रज्ञानाचा प्रकल्प हवा. कुडतरीचा कचरा तेथे जात नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: गोवा पोलिसांकडून पर्यटकांची लूट? महाराष्ट्राच्या पर्यटकानं व्हिडिओ शेअर करत केली पोलखोल, शूटिंग करताच काढला पळ

Cricketer House Attack: क्रिकेट जगतात खळबळ! 'या' स्टार क्रिकेटपटूच्या घरावर गोळीबार; कुटुंबातील सदस्य सुरक्षित, 5 जण अटकेत VIDEO

103 Year Old Man Goa: 'म्हातारा इतुका न अवघें...'! गोव्यातील 103 वर्षांचे धवलक्रांतीदूत; आजही सांभाळतात शेती, राखतात जनावरे

VIDEO: चालता चालता अचानक कोसळले अभिनेते जितेंद्र, चाहते चिंतेत; तुषार कपूरनं दिली हेल्थ अपडेट

Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोटानंतर गोव्यात अलर्ट! सुरक्षा तपासणीचे आदेश; गर्दीच्या ठिकाणी गस्त

SCROLL FOR NEXT