Madgaon Cleaning Dainik Gomantak
गोवा

Madgaon Pre-monsoon Cleaning: मडगावात पावसाळापूर्व कामांना सुरूवात; कोंबवाडा प्रभाग झाला चकाचक, 30 मजूर तैनात

Margao Municipality: मडगाव नगरपालिकेतर्फे पावसाळापूर्व कामांना सुरुवात झाली असून २५ पैकी जवळजवळ सहा प्रभागांतील कामे पूर्ण झाली आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

सासष्टी : मडगाव नगरपालिकेतर्फे पावसाळापूर्व कामांना सुरुवात झाली असून २५ पैकी जवळजवळ सहा प्रभागांतील कामे पूर्ण झाली आहेत. यात १,२,३,१२,१३,१४ या प्रभागांचा समावेश आहे.

प्रभाग १२ मधील कोंबवाडा परिसरात नगरसेवक सगुण नायक यांच्या देखरेख व मार्गदर्शनाखाली नाले स्वच्छ करणे, रस्त्याच्या बाजूची झाडेझुडपे कापणे, नाल्यावरील सिमेंटच्या लाद्या दुरुस्त करणे व काही ठिकाणी बदलणे यांसारखी कामे पूर्ण झाली आहेत. कोंबवाड्यावर कचरा फेकण्यासाठी जी जागा आहे, तीसुद्धा नियमित स्वच्छ केली जाते, असे सगुण नायक यांनी सांगितले.

कोंबवाड्यावरील काम पूर्ण करण्यासाठी सात दिवस लागले. त्यासाठी नगरपालिकेने दहा मजुर दिले होते. ही केवळ प्राथमिक फेरी असून दुसऱ्या फेरीत अन्य कामे हातात घेतली जातील. केवळ मुख्य रस्त्यांवरीलच नव्हे, तर गृह सोसायट्या व आतील भाग सुद्धा स्वच्छ करण्यात आल्याचे नायक यांनी सांगितले.

१६ मेपर्यंत पूर्ततेचे लक्ष्य

१६ मेपर्यंत मडगावमधील सर्व प्रभागांतील पावसाळापूर्व कामे पूर्ण करण्याचे पालिकेचे लक्ष्य आहे. त्यासाठी ३० मजूर तैनात केले असून दहाजणांची एक अशा तीन तुकड्या केल्या आहेत. एकाचबरोबर तीन प्रभागांमधील कामे हातात घेतली जात आहेत.

कचरा नेण्यासाठी तीन ट्रकांची व्यवस्था केली असून प्रत्येक ट्रकवर पाच कामगार ठेवले आहेत. पालिकेने पावसाळापूर्व कामासाठी वेळापत्रक तयार केले असून त्यानुसार कामे पूर्ण केली जात आहेत.

२५ मार्चपासूनचे कामाचे वेळापत्रक

१) २५ मार्च ते १ एप्रिल प्रभाग ४,५,१५,

२) २ ते ८ एप्रिल प्रभाग ६,१६,१७

३) ९ ते १६ एप्रिल प्रभाग ७,८,१८

४) १७ ते २४ एप्रिल प्रभाग ९,१९,२०

५) २५ एप्रिल ते २ मे प्रभाग १०,११,२१

६) ३ ते ९ मे प्रभाग २२,२३,२४

७) १० ते १६ मे प्रभाग २५ व शहरी भाग.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम! IMD कडून 31 जुलैपर्यंत 'यलो अलर्ट'; मुसळधार सरींचा अंदाज

CJP Protest Violence: 'सीजेपी' आंदोलनातील हिंसेमागे पाकिस्तान कनेक्शन! दंगल घडवण्यासाठी भामट्यांनी वापरले 'ब्लूटूथ ॲप्स'; पोलिस तपासात हायटेक नेटवर्क उघड

Who is Samreen Kaur: टीम इंडियाचा मॅचविनर 'समरीन'च्या प्रेमात क्लिन बोल्ड! गर्लफ्रेंडसोबतचा रोमँटिक फोटो शेअर; पाहा कोण आहे ती?

CJP Protest: "शांततापूर्ण आंदोलन हा घटनात्मक अधिकार!" विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज पोलिसांना नडला; दडपशाही रोखण्यासाठी सुप्रीम कोर्टाचा मास्टरप्लॅन

3 कोटी द्या, मंत्रीपद घ्या! आमदार-खासदारांना गंडा घालणाऱ्या ठगांचा पर्दाफाश; प्रियंका गांधींचा बनावट पीए बनून केली कोट्यवधींची मागणी

SCROLL FOR NEXT